लग्नाचा खर्च टाळून समाजोपयोगी उपक्रम


दैनिक स्थैर्य । 22 मे 2025। बारामती। मेडद ता. बारामती येथे विवाह सोहळ्यात होणार्‍या अनावश्यक खर्चाला फाटा देऊन सामाजिक जाणिवेतून वाचविलेल्या पैशांतून विद्यालयातील वर्गखोल्यांना पंखे बसविले.

मेडद ता. बारामती येथील माजी सैनिक दादासाहेब बबनराव कांबळे यांच्या मुलीची लग्नात देवाला जाण्यासाठीची मिरवणूक डीजे न लावता साधेपणाने काढली त्यामध्ये होणारा अनावश्यक खर्च टाळला. त्या खर्चातून मेडद परिवारातर्फे श्री. भैरवनाथ माध्यमिक विद्यालयातील तीन वर्गामध्ये पंखे बसविण्यात आले. या पंखामुळे विद्यार्थ्यांना उन्हाळ्यापासून त्रास होणार नाही. या उपक्रमामुळे त्यांनी समाजासमोर एक आदर्श निर्माण केला आहे.

कार्यक्रमास अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या बारामती शाखेचे अध्यक्ष अ‍ॅड. विजय बर्गे, कुष्ठरोग तज्ञ हरिभाऊ हिंगसे, प्रा. डॉ. ज्ञानदेव सरवदे, माजी ग्रामपंचायत सदस्य संतोष यादव, पत्रकार माधव झगडे, कृष्णा शिंदे, डॉ. मकरंद कांबळे, भैरवनाथ विद्यालयाचे अध्यक्ष माधव गावडे, मुख्याध्यापक नाकोरे, मुख्याध्यापक गायकवाड, स्नेहांकित कांबळे, सुजल कांबळे, कुणाल कांबळे, राज नेवसे, यश नेवसे, आदित्य नेवसे, ओम नेवसे, ग्रामपंचायत सदस्य मालन कांबळे, सोनाली नेवसे, दिपाली कांबळे, प्रहरी कांबळे, सार्थक कांबळे, अनन्या कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!