
दैनिक स्थैर्य । 22 मे 2025। सातारा। सध्या दरवर्षीप्रमाणे उन्हाळा संपता संपता पश्चिम बंगाल, कोलकत्ता येथून चक्क विमानाने सातारा शहरात लालचुटुक आणि चवीला गोड अशा लीची फळांची मोठ्या प्रमाणात आवक झाली आहे. विमानाने ही लिची फळे प्रवास करून येत असल्यामुळे सध्या या फळांचा दर किलोला चारशे रुपये प्रति किलो असा आहे. राजपथावर फिरत्या गाड्यावरून फळाची विक्री त्यांनी केलेली ही विक्री आपल्या कॅमेर्यात टिपली आहे पत्रकार अतुल देशपांडे यांनी.