सासकल : उद्यानविद्या महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींकडून पशु आरोग्य तपासणी

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

ग्रामीण उद्यानविद्या कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत सासकल येथे पशु आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन; डॉ. किरण लोंढे यांचे मार्गदर्शन आणि जनावरांचे लसीकरण.

स्थैर्य, सासकल, दि. १० जून : फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालयाच्या सातव्या सत्रातील विद्यार्थिनींनी (उद्यान कन्या) ग्रामीण उद्यानविद्या कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत सासकल (ता. फलटण) येथे ५ जून रोजी पशु आरोग्य तपासणी शिबिराचे यशस्वी आयोजन केले होते.

रोगराई प्रतिबंध आणि गोठा निर्जंतुकीकरण

या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. किरण लोंढे तर अध्यक्ष म्हणून सास्कलच्या सरपंच सौ. सोनाली मदने उपस्थित होत्या. यावेळी डॉ. किरण लोंढे यांनी ग्रामस्थांना जनावरांमधील रोगांचा प्रादुर्भाव, त्याचा प्रसार आणि लसीकरणाचे महत्त्व यावर सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच गोठ्यांचे प्रभावी निर्जंतुकीकरण कसे करावे, याबाबत माहिती देऊन गावातील जनावरांचे लसीकरण पूर्ण केले.

मान्यवरांचे मार्गदर्शन व यशस्वी अंमलबजावणी

या महत्त्वपूर्ण उपक्रमासाठी उद्यान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. डी. निंबाळकर, कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. चव्हाण, प्रा. जे. व्ही. लेंबे, समन्वयक प्रा. ए. डी. पाटील आणि प्रा. डॉ. पी. एस. मिटकरी यांचे विद्यार्थ्यांना विशेष मार्गदर्शन लाभले.

त्यांच्या मार्गदर्शनाखाली उद्यान कन्या रिया गोदारा, प्रेरणा कदम, शरयू कोकरे, ऐश्वर्या मेटकरी, रक्षिता हर्ती, भाग्यश्री कांबळे आणि दीक्षा सोनवणे यांनी हा कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडला.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!