
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
दैनिक स्थैर्य | दि. 24 जानेवारी 2024 | फलटण | फलटण तालुक्यामध्ये मराठा समाजाचे सामाजिक व आर्थिक सर्वेक्षणाला प्रांताधिकारी सचिन ढोले यांच्या प्रमुख उपस्थितीत सुरवात झाली आहे.
याबाबत अधिक माहिती देताना प्रांताधिकारी ढोले म्हणाले की; मराठा समाजाच्या सामाजिक व आर्थिक सर्वेक्षणाला फलटण तालुक्यात सुरवात झाली असून या सर्व प्रक्रियेवर तहसीलदार डॉ. अभिजित जाधव, मुख्याधिकारी संजय गायकवाड, गटविकास अधिकारी चंद्रकांत बोडरे हे स्वतः लक्ष ठेवून आहेत.
सदर सर्वेक्षणासाठी 900 पेक्षा जास्त कर्मचारी समाविष्ट केले असून 31 जानेवारी अखेर हा सर्व्हे पूर्ण करण्यासाठी प्रांताधिकारी सचिन ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही प्रयत्नशील आहोत; असे मत तहसीलदार डॉ. अभिजित जाधव यांनी यावेळी स्पष्ट केले.
