दैनिक स्थैर्य | दि. २४ जानेवारी २०२४ | फलटण |
सांगली येथे झालेल्या विभागस्तरीय शालेय क्रिकेट स्पर्धेतील (१४ वर्षे मुले) उत्कृष्ट कामगिरीमुळे मुधोजी हायस्कूल, फलटणचा विद्यार्थी इंद्रजित मयूर गुंजवटे याची राज्यस्तरीय निवड चाचणी स्पर्धेसाठी निवड झाली आहे. ही स्पर्धा शंकरराव मोहिते पाटील इंग्लिश स्कूल व ज्युनि. कॉलेज शंकरनगर, अकलूज, ता. माळशिरस, जि. सोलापूर येथे ४ फेब्रुवारी रोजी होणार आहे.
या निवडीबद्दल इंद्रजित गुंजवटे याचे मुधोजी हायस्कूलचे प्राचार्य, शिक्षक, क्रीडाशिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच मान्यवरांकडून अभिनंदन करण्यात येत आहे.