
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
दैनिक स्थैर्य | दि. ३ नोव्हेंबर २०२४ | फलटण |
श्री भैरवनाथ एज्युकेशन सोसायटी गुणवरेच्या अध्यक्षा व माजी जिल्हा परिषद सदस्य कै. वसंतराव कणसे बापू यांच्या पत्नी श्रीमती वनिता वसंतराव कणसे (वय ७६) यांचे आज अल्पशा आजाराने निधन झाले.
कै. वसंतराव कणसे यांच्या पश्चात श्रीमती वनिता कणसे यांनी श्री भैरवनाथ एज्युकेशन सोसायटीची धुरा यशस्वीरित्या सांभाळून संस्थेच्या जडणघडणीत महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. त्यांच्या पश्चात चार मुली, एक मुलगा, सून, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या अंत्यविधीस सामाजिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर व गुणवरे परिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते.
