सातारा जिल्हयात स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्र अभियान राबविणार : पालकमंत्री शंभुराज देसाई


दैनिक स्थैर्य । दि. ०८ ऑक्टोबर २०२२ । सातारा । प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत दर्जेदार गुणवत्तापुर्वक सर्व समावेशक आरोग्य सेवा देण्यासाठी सातारा जिल्ह्यात स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्र अभियान राबविण्याच्या सूचना पालकमंत्री तथा राज्य उत्पादन शुल्क मंत्री  शंभुराज देसाई यांनी दिल्या.

स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्र अभियान बैठक पालकमंत्री श्री. देसाई यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.  त्यावेळी श्री. देसाई बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, जिल्हा आरोग्य अधिकारी  डॉ. राधाकिशन पवार, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण  उपस्थित होते.

बैठकीत स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्र अभियान राबविण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. या अभियानासाठी लागणारा निधी जिल्हा वार्षिक योजना  व जिल्हा परिषदेच्या सेस मधून उपलब्ध करुन देण्याच्या सूचना यावेळी पालकमंत्री श्री. देसाई यांनी केल्या. या अभियानामुळे प्राथमिक आरोग्य केंद्राचा दर्जा उंचावून सेवा, क्षमता व स्वच्छता इत्यादी बाबीमध्ये ती नेहमीची अग्रेसर राहतील. तसेच या अभियानामध्ये स्मार्ट भौतिक पायाभूत सुविधा, मनुष्यबळाचे सक्षमीकरण, यंत्रसामुग्रीची देखभाल, सर्व समावेश दर्जेदार आरोग्य सेवा व जनसहभाग इत्यादी गोष्टींचा समावेश असेल. तसेच प्रसूतिगृह, शस्त्रक्रियागृह, बाह्य रुग्ण विभाग, अंतर रुग्ण विभाग, प्रयोगशाळा, औषध भांडार, संगणक कक्ष, सोलर उर्जा वापर, रेन वॉटर हार्वेस्टिंग, स्वागत कक्ष, अंतर्गत रस्ते, संरक्षण भिंत, परिसर सुशोभिकरण-गार्डन, आयुष गार्डन, कॅटल ट्रप, प्रसाधनगृह इ. भौतिक सुविधा पुरविल्या जातील.

आरोग्य विभाग जिल्हा परिषद मार्फत स्मार्ट पी एच सी हा  नाविन्यपूर्ण उपक्रम निवडक 17 प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये राबविण्यात येत आहे. तो पुढील प्रमाणे सातारा तालुका- प्रा. आ. कें. चिंचणेर वंदन व  नागठाणे,  जावली – प्रा. आ. कें. बामणोली व कुडाळ, महाबळेश्वर- प्रा.आ.कें. तापोळा, वाई – प्रा.आ.कें.कवठे, खंडाळा- प्रा.आ.कें. अहिरे, फलटण- प्रा.आ.कें. बरड, माण – प्रा.आ.कें. पळशी व  मार्डी, खटाव- प्रा.आ.कें. पुसेगांव, कोरेगांव- प्रा.आ.कें.किन्हई व सातारारोड, कराड- प्रा.आ.कें.इंदोली व वडगांव हवेली, पाटण – प्रा.आ.कें. हेळवाक व तळमावले.


Back to top button
Don`t copy text!