१० ऑक्टोबर रोजी सर्व रोग वैद्यकीय व दंत शिबीराचे आयोजन

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

दैनिक स्थैर्य । दि. ०८ ऑक्टोबर २०२२ । सातारा । सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन, राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जिल्हा रुग्णालय सातारा येथे सोमवार दि. 10 ऑक्टोबर रोजी मोफत जिल्हास्तरीय सर्व रोग वैद्यकीय व दंत शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.

या शिबीरामध्ये कान, नाक, घसा, स्त्रीरोग, अस्थिरोग, कर्करोग, मधुमेह, उच्चरक्तदाब, नेत्र व इतर तपासणी होणार आहे. या आरोग्य शिबीरामध्ये लाभार्थ्यांसाठी सर्व सुविधा मोफत दिल्या जातील.  तरी सर्व लाभार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन  जिल्हा शल्यचिकित्सक, सातारा यांनी केले आहे.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!