दैनिक स्थैर्य | दि. २३ नोव्हेंबर २०२४ | फलटण |
तेजज्ञान फाउंडेशन अर्थात ‘हॅपी थॉटस्’ या आध्यात्मिक संस्थेच्या वतीने रविवार, दि. २४ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ ते ७ यावेळेत मोफत रजत जयंती ध्यान महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
नवलबाई मंगल कार्यालय, मारवाड पेठ, फलटण येथे होणार्या या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून कृष्णा ग्रुप, छत्रपती संभाजीनगरचे सीईओ श्री. अभिजित धर्माधिकारी आणि प्रा. राज कदम (सहयोगी प्राध्यापक (इंग्रजी), विद्या प्रतिष्ठान महाविद्यालय, बारामती) हे उपस्थित राहणार आहेत.
ध्यानाबाबात जागरुकता निर्माण करून लोकांना त्यांच्या जीवनात संतुलन आणि सकारात्मकता आणण्यासाठी मदत करणे व जागतिक शांततेसाठी योगदान देण्यासाठी रविवारी फलटणमध्ये ध्यान महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
समाजातील सर्व नागरिकांनी या निःशुल्क कार्यक्रमास उपस्थित रहावे, असे आवाहन फलटण ज्ञानध्यान केंद्राच्या श्री. सतीश हिप्परकर यांनी केले आहे.