फलटणचे श्रीराम मंदिर भाविकांसाठी खुले

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

 

स्थैर्य, फलटण, दि. १७ : राज्य सरकारने सोमवारपासून मंदिरांचे दरवाजे उघडण्याची घोषणा केल्यानंतर फलटण येथील प्रभु श्रीराम मंदिर व्यवस्थापनाने रविवारी दिवसभर नियोजन करून भाविकांना योग्य ती काळजी घेवुनच दर्शन घेण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. भाविकांमध्ये दर्शनप्रसंगी सुरक्षित अंतर ठेवण्यासाठी मंदिर प्रांगणात चौकोन आखण्यात आले आहेत. तसेच मंदिर आवारात प्रवेश करताना सॅनिटायझर मारूनच प्रवेश दिला जात आहे. देवळांबाबतचा निर्णय जाहीर होताचा येथील पुरोहितांना ‘गुरूजी आम्ही कधी यायचे’ अशा प्रकारचे फोन करून भाविक विविध पूजाविधींबाबत विचारणा केली जात आहे.

राज्य सरकारच्या आदेशानुसार येथील प्रभु श्रीरामाचे आणि इतर सर्व मंदिरे दिवाळी पाडव्यापासून दर्शनासाठी खुली करण्यात येणार आहेत. सोमवारी पहाटे मंदिर उघडण्यात आले आहे. त्याआधी रविवारी नाईक निंबाळकर देवस्थान ट्रस्टने कोरोना काळात कोणती काळजी घेवुन मंदिर खुले केली पाहिजेत याची योग्य ती अंमलबजावणी केलेली आहे.

भाविक लक्ष्मीपूजनानंतर देवदर्शनासाठी बाहेर पडतात. त्यामुळे रविवारी काही भाविक शहरात पहायला मिळाले. गेल्या आठ महिन्यांपासून मंदिरे बंद असल्याने येथील अर्थव्यवस्थेला खीळ बसली आहे. मात्र कालपासून शहरात चैतन्य पसरले आहे. मंदिरावर अवलंबून असलेल्या व्यवसायिकांनीही दिवसभर आपली दुकाने सजविण्यावर भर दिला.

प्रभु श्रीराम मंदिराच्या मुख्य दरवाजापासुन चौकोन आखले आहेत तर दर्शन घेवुन झाल्यानंतर सभामंडपात बसण्यास, थांबण्यास मनाई केलेली आहे. शासनाच्या निर्णयाचे स्वागत भाविकांनी केलेले आहे. कोरोना काळात मंदिर खुले केल्याने खबरदारीची योग्य ती कार्यवाही नाईक निंबाळकर देवस्थान ट्रस्टने केली आहे. तथापि भाविकांनी संयम पाळावा एकाच वेळेस गर्दी करू नये, असे आवाहनही नाईक निंबाळकर देवस्थान ट्रस्टच्या माध्यमातून करण्यात आलेले आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!