
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
दैनिक स्थैर्य | दि. 12 ऑक्टोबर 2024 | फलटण | सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सातारा जिल्हाध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी काल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षामध्ये जाण्यासंदर्भातचा निर्णय जाहीर केला होता. त्यानंतर आज लगेचच त्यांनी अजितदादा पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याकडे सुपूर्द केला आहे.

फलटण तालुक्याचे नेते श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर व फलटण – कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार दीपक चव्हाण हे दि. 14 ऑक्टोबर रोजी फलटण येथे जाहीर कार्यक्रमांमध्ये माजी केंद्रीय मंत्री शरदचंद्रजी पवार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या पक्षामध्ये जाहीर प्रवेश करणार आहेत.
