श्रीमंत रामराजे प्रतापसिंह नाईक निंबाळकर वाहतूक संस्थेची निवडणूक बिनविरोध

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । 10 मे 2025 । फलटण । येथील श्रीमंत रामराजे प्रतापसिंह नाईक निंबाळकर वाहतूक सहकारी संस्थेची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध संपन्न झाली आहे. सदरील निवडणुकीमध्ये श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्यासह अन्य 12 संचालकांची निवड ही बिनविरोध करण्यात आली आहे.

श्रीमंत रामराजे प्रतापसिंह नाईक निंबाळकर वाहतूक सहकारी संस्था मर्या. फलटण या संस्थेची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच संपन्न झाली. निवडणूक संपन्न झाल्यानंतर संस्थेच्या चेअरमनपदी विधान परिषदेचे माजी सभापती तथा विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे प्रतापसिंह नाईक निंबाळकर यांची तर व्हॉइस चेअरमन पदी सलीम खान यांची निवड सुद्धा बिनविरोध करण्यात आली आहे.

संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये सर्वसाधारण मतदारसंघांमधून श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, नितीन रमेशचंद्र भोसले, गणेश प्रभाकर जेवले, अमीर अहमद काझी, रामचंद्र ज्ञानेश्वर नाईक निंबाळकर, हिरालाल यशवंत घाडगे, प्रकाश साहेबराव गरुड, मतीन अन्वर शेख हे बिनविरोध निवडून आले आहेत. तर अनुसूचित जाती जमाती या मतदार संघामधून जॉनी अरविंद पलंगे, इतर मागासवर्ग प्रवर्गातून सलीम खान, महिला राखीव मतदार संघामधून सुशीला मोहन गायकवाड, गायत्री संजय थोरात या निवडून आल्या आहेत.

निवडणूक संपन्न झाल्यानंतर संस्थेच्या नवनिर्वाचित संचालकांना आमदार तथा संस्थेचे चेअरमन श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार दिपक चव्हाण, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, फलटणचे युवराज श्रीमंत अनिकेतराजे नाईक निंबाळकर, युवा नेते श्रीमंत सत्यजितराजे नाईक निंबाळकर, फलटण पंचायत समितीचे माजी सभापती श्रीमंत विश्वजीतराजे नाईक निंबाळकर यांच्यासह फलटण तालुक्यासह सातारा जिल्ह्यातील विविध मान्यवरांनी अभिनंदन केले.


Back to top button
Don`t copy text!