फलटण येथे ना.श्रीमंत रामराजे यांच्या हस्ते ‘कोवीड 19 लसीकरणा’चा आज शुभारंभ

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, फलटण दि.१६ :  कोविड संसर्ग प्रतिबंधक लस उपलब्ध झाली असून 16 जानेवारीपासून लस देण्यात येणार आहे.  याचा  जिल्ह्यात शुभारंभ कार्यक्रम जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्यासह लोकप्रतिनिधींच्या प्रमुख उपस्थितीत होणार असून फलटण येथे उपजिल्हा रुग्णालयात महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती ना.श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते या लसीकरण मोहिमेचा शुभारंभ होणार आहे असून यावेळी फलटण कोरेगाव विधानसभा मतदार संघाचे आमदार दीपक चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती राहणार असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.

स्व. क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील, खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले, आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, सातारच्या नगराध्यक्षा माधवी कदम यांच्या प्रमुख उपस्थित होणार आहे. तर उपजिल्हा रुग्णालय, कराड येथे गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई व खासदार श्रीनिवास पाटील यांच्या  प्रमुख उपस्थित शुभारंभ कार्यक्रम होणार आहे.

उपजिल्हा रुग्णालय, फलटण येथे विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निबाळकर, आमदार दिपक चव्हाण, ग्रामीण रुग्णालय पाटण गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई, ग्रामीण रुग्णालय कोरेगाव येथे आमदार महेश शिंदे, ग्रामीण रुग्णालय दहिवडी येथे आमदार जयकुमार गोरे,खंडाळा आणि  मिशन हॉस्पीटल, पाचगणी   येथे आमदार मकरंद पाटील यांच्या प्रमुख उपस्थित शुभारंभ होणार असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुभाष चव्हाण यांनी दिली.


Back to top button
Don`t copy text!