
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
दैनिक स्थैर्य | दि. २२ जुलै २०२४ | फलटण | श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा फलटण येथे मुक्कामी असताना पालखी सोहळा प्रमुख योगी निरंजननाथ यांनी फलटण तालुक्यातील गिरवी येथील प्राचीन असलेल्या श्री गोपाळ कृष्ण मंदिरात दर्शन घेतले. यावेळी मंदिर व परिसराची पाहणी केल्यानंतर त्यांनी समाधान व्यक्त केले.
गिरवी येथे असणाऱ्या श्री गोपाळ कृष्ण मंदिराचा इतिहास ऐकून योगी निरंजननाथ यांनी समाधान व्यक्त केले. यावेळी श्री गोपाळ कृष्ण मंदिराचे जयंत देशपांडे यांनी मंदिराची माहिती दिली व त्यांचा यथोचित सन्मान केला.
