दैनिक स्थैर्य । दि. ३० जुलै २०२२ । आटपाडी । सुविधा हॉस्पीटल आटपाडी च्या व्यवस्थापना खाली श्री सेवा मल्टी स्पेशालिटी हॉस्पीटल चा शुभारंभ शेकडो मान्यवर महोदय समाजातील सर्व क्षेत्रातील नागरीक बंधू भगिनी युवक मित्रांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात करण्यात आला .
श्री सत्य नारायण महापुजा – प्रसाद, सर्वांना दिला गेलेला अल्पोपहार, आलेल्या प्रत्येकाचे केले गेलेले प्रेमपूर्वक स्वागत, पुष्पगुच्छ शाल श्रीफळ देवून केला गेलेला अनेकांचा सत्कार, सुविधाची प्रेमळ आपुलकी दर्शवून गेला.
आटपाडी तालुक्यातील अनेक नामंकीत डॉक्टर्स मंडळीनी गेली अनेक वर्षे मोठ्या तडफेने चालविलेले आणि आरोग्याची उत्तम देखभाल करणारे, आस्था,आपुलकी, श्रध्दा आणि विश्वासार्हतेने सर्वांना आपलेसे वाटणारे आटपाडीचे सुविधा हॉस्पीटल आसपासच्या माण, खटाव, सांगोला, पंढरपूर, माळशिरस, कवठेमहंकाळ ,जत, खानापूर ,तासगांव सह अन्य तालुक्यात लोकप्रिय ठरले . याच सुविधा हॉस्पीटल च्या व्यवस्थापनाच्या मार्गदर्शनाखाली, आटपाडी च्या साई मंदिर परिसरात पूर्वी पासून सेवा देत असलेले श्री .सेवा मल्टी स्पेशालिटी हॉस्पीटल व आयसीयु चा आज पुन्हा मोठ्या उत्साहात शुभारंभ करण्यात आला.
सुविधा आणि श्री .सेवा हॉस्पीटल च्या व्यवस्थापनास अनेक मान्यवरांनी शुभेच्छांचा वर्षाव करीत या सर्वांप्रतीचा विशेष आदर व्यक्त केला. सांगली जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार संजयकाका पाटील, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक आटपाडी तालुक्याचे नेते तानाजीराव पाटील, आटपाडी तालुका पंचायत समितीचे माजी सभापती हर्षवर्धन देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेसचे आटपाडी तालुक्याचे नेते भारततात्या पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे खानापूर आटपाडी विधानसभा मतदार संघाचे माजी अध्यक्ष आनंदरावबापू पाटील, राष्ट्रवादीचे मतदार संघाचे विद्यमान अध्यक्ष सुशांत देवकर, राष्ट्रवादीचे आटपाडी तालुका अध्यक्ष हणमंतराव देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्याक विभागाचे प्रदेशचे महासचिव सादिक खाटीक, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे सांगली जिल्हा अध्यक्ष राजेंद्र खरात, शिवसेना नेते दत्तात्रय पाटील पंच, भाजपाचे नेते अनिलशेठ पाटील, विनायकराव मासाळ, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी अध्यक्ष भाऊसाहेब गायकवाड, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा नेते अरुणराव वाघमारे, करगणीचे नेते दादाशेठ कचरे, दिघंचीचे सरपंच अमोल मोरे, दिघंचीचे भाजपा नेते अमोल काटकर, उद्योगपती रवीशेठ सतारकर, जि . प . चे माजी सदस्य अरुण बालटे राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हा उपाध्यक्षा सौ. अनिता पाटील इत्यादी अनेकांनी श्री सेवा व सुविधा च्या मान्यवर महोदयांना यावेळी शुभेच्छा दिल्या . सुविधा व्यवस्थापनाने या मान्यवरांचा शाल पुष्पगुच्छ देत सन्मान केला . यावेळी डॉ . किरण लाळे, डॉ विनय पत्की, डॉ . एम . वाय. पाटील, डॉ . अनिरुद्ध पत्की, डॉ . जाधव , डॉ . श्रीनाथ पाटील, डॉ. खरजे, डॉ . मृगेंद्र गोंजारी, डॉ सौ . सुजिता लाळे, डॉ . सौ . सुप्रिया जाधव, डॉ . गायकवाड सर्व डॉक्टर – कर्मचारी यांनी सर्वांचे स्वागत करताना, प्रधानमंत्री जनआरोग्य योजना आणि महात्मा फुले जन आरोग्य योजना या शासकीय योजनांचा लाभ पात्र पेशंटना श्री सेवा हॉस्पीटलमध्ये लाभ दिला जाणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले .