स्वच्छ महाराष्ट्र अभियानंतर्गत श्रमदान स्वच्छता अभियान व जनजागृती रॅली


दैनिक स्थैर्य । दि. १७ जानेवारी २०२३ । फलटण । स्वच्छ सर्वेक्षण २०२३ अंतर्गत फलटण नगरपरिषदेने स्वच्छता श्रमदान अभियान,राबिविण्यासाठी प्रत्येक प्रभागात डिसेंबर पासून सुरवात केली आहे. प्रभाग क्रमांक ८ जलमंदिर परिसर मध्ये फलटण नगरपरिषदेच्या वतीने स्वच्छता अभियान व श्रमदान प्रभाग क्रमांक ८ मध्ये राबविण्यात आले.

सदर अभियानामध्ये महिला अर्थिक विकास व महिला बचत गटांचा तसेच जवळपास 100 नागरिकांचा उस्पुर्त सहभाग होता, “श्रमदान स्वच्छता” या अभियानात नगरपरिषदेचे सर्व विभागप्रमुख व अधिकारी कर्मचारी असे २०० कर्मचारी सहभागी झाले होते.

तसेच नगरपरिषदेकडील 4 घंटागाडी व 3 ट्रॅक्टर १ क्रेन यांचा वापर करणेत आला.अभियाना दरम्यान प्रभागातील नागरिकांना ओला सुका कचरा वर्गीकरण, ओला कचऱ्या पासून घरगुती खत निर्मिती याबाबत प्रात्यक्षिकाद्वारे नागरिकांना माहिती देण्यात आली.

घंटागाडी मध्ये येणाऱ्या कचऱ्यावर कशा प्रकारे प्रक्रिया केली जाते,ओल्या कचऱ्यापासून कंपोस्ट खत कसे बनवले जाते आणि जे खत बनते ते शेती व बागेसाठी वापरले जाते.तरी नागरिकांनीही घंटागाडीत कचरा वर्गीकरण करून दयावा अशी जनजागृती करण्यात आली.

यावेळी सदर अभियाना दरम्यान मुख्याधिकारी संजय गायकवाड यांनी विभाग प्रमुख यांनी उपस्थित नागरिकांसोबत संवाद साधत प्रभागातील रस्ते, पाणी पुरवठा तसेच, शौचालय सबंधित अडचणी समजुन घेऊन त्या सोडविण्यासाठी संबधितांना सूचना दिल्या.

फलटण नगरपरिषदेने येथून पुढील प्रत्येक मंगळवारी व शुक्रवारी स्वच्छता श्रमदान अभियान राबविण्यात येणार आहे मुख्याधिकारी संजय गायकवाड यांनी सांगितलेले आहे.

सदर परिसरातील श्रमदान अभियान यशस्वी करण्यासाठी सदरच्या प्रभागातील सन्माननीय सदस्य, प्रतिष्टीत व्यक्ती, शाळा, महाविद्यालय, बचत गट, सामाजिक संस्था यांनी उपस्थित रहावे. असे आवाहन मुख्याधिकारी संजय गायकवाड यांनी केले आहे.


Back to top button
Don`t copy text!