शिरवळ सरपंचाची ग्रामसभा स्थगितीची याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली


 

स्थैर्य, खंडाळा, दि.१८: शिरवळ सरपंचांविरुध्द अविश्वास प्रस्तावाची विशेष ग्रामसभा (मतदान) शुक्रवार दि.१८ डिसेंबर रोजी होणार असून शिरवळ सरपंच लक्ष्मी पानसरे  यांनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये दाखल केलेल्या याचिकेमध्ये शुक्रवार दि. १८ डिसेंबर रोजी सकाळी १०वाजता होणारी विशेष ग्रामसभा (मतदान) प्रक्रियेला स्थगिती मागितलेली होती.ती स्थगिती याचिका मा.उच्च न्यायालयाने फेटाळली.त्यामुळे शिरवळ  परिसरात विविध चर्चेला उधाण आले आहे.

यावेळि महाविकास आघाडीकडून अँड.प्रदिप गोळे,अँड.अजित केंजळे व सरकारतर्फे सरकारी वकील श्रीमती बने यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य धरत शिरवळ सरपंचांची विशेष ग्रामसभा (मतदान) स्थगितीची याचिका फेटाळली आहे.

 यावेळी शिरवळ ता. खंडाळा येथील सरपंच लक्ष्मी सागर पानसरे यांच्याविरुद्ध अविश्वास ठराव १६ डिसेंबर २०१९ रोजी मंजूर करण्यात आलेला आहे.

 त्या अनुषंगाने मा. जिल्हाधिकारी सो. सातारा यांचेकडील आदेश क्रमांक साशा/ ग्राप /आर आर /४/१७०/ २० दि .९/१२/२० रोजी अन्वये खंडाळा तहसीलदार दशरथ काळे यांना प्राधिकृत केले आहे.

या अनुषंगाने मौजे शिरवळ ता. खंडाळा जि. सातारा या ग्रामपंचायतीमधील सरपंच अविश्वास ठरावाबाबत आज शुक्रवार दि. 18 डिसेंबर रोजी सकाळी दहा वाजता ज्ञानसंवर्धिनी विद्यालय ,शिरवळ ता. खंडाळा येथे विशेष ग्रामसभा (मतदान) आयोजित करण्यात येत आहे .

सदर विशेष ग्रामसभेमध्ये गुप्त पद्धतीने मतदानाकरिता एकूण चौदा मतदान केंद्र प्रस्तावित केली असून मतदारांची एकूण संख्या  ११,७५७ इतकी आहे तसेच सदर विशेष ग्रामसभेचे मतदान ज्ञानसंवर्धिनी विद्यालय शिरवळ येथे शुक्रवार दि.१८ डिसेंबर  रोजी सकाळी दहा ते चार वाजेपर्यंत होणार आहे .त्यासाठी मतदान केंद्रावर मतदारांना यादी भाग निहाय अनुक्रमांक शोधून देण्यासाठी १४ कर्मचारी यांची केंद्रनिहाय नियुक्ती केली आहे .तसेच गुप्त मतदान सुरळीतपणे पार पाडणे करता ५६ अधिकारी कर्मचारी यांची केंद्रनिहाय नेमणूक करण्यात आली आहे .तसेच त्याचदिवशी त्याच ठिकाणी मतदान झाल्यानंतर मतमोजणीची कारवाई होणार आहे .त्यासाठी ५६ अधिकारी कर्मचारी यांची केंद्रनिहाय नेमणूक करण्यात आली आहे .यावेळी १४ मतदान केंद्राकरिता तीन क्षेत्रीय अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे हे सर्व गुप्त मतदान सुरळीतपणे पार पाडण्याकरता केंद्र शासन व राज्य शासनाचे covid-19 बाबत वेळोवेळी दिलेले मार्गदर्शक सूचना व तसेच साथरोग प्रतिबंध कायदा १८९७ अन्वये मतदार यांची तपासणी कामी आरोग्य कर्मचारी यांची चौदा केंद्रावर नियुक्ती करण्यात आली आहे. पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात नेमण्यात आला आहे. यावेळी बाजी कोण मारणार याबाबत विविध चर्चेला उधाण आले आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!