• Contact us
  • Home
  • Privacy Policy
स्थैर्य
Advertisement
  • मुख्य पान
  • फलटण
  • सातारा जिल्हा
  • बारामती
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर
  • मुख्य पान
  • फलटण
  • सातारा जिल्हा
  • बारामती
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result

शाहुपुरीसह नवी मुंबईतील 3 जबरी चोरीचे गुन्हे उघडकीस शाहुपुरी डी.बी. पथकाची कामगिरी 

Team Sthairya by Team Sthairya
डिसेंबर 18, 2020
in Uncategorized

 

स्थैर्य, सातारा, दि.१७: शाहूपुरी येथे महिलेले गंठण हिसकावून नेणार्‍या दोघांना शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या डी. बी. पथकाने जेरबंद केले आहे. ऋषिकेश पांडुरंग देटे वय 24 वर्ष रा. सेक्टर नं. 15 कोपरखैरणे नवी मुंबई आणि सुनिल रामचंद्र भोसले वय 43 वर्ष रा. शाहुपुरी सातारा अशी त्यांची नावे आहेत. यातील ऋषिकेश देटे यास नवी मुंबईतून अटक केल्यानंतर त्याने मुंबईत केलेल्या आणखी दोन जबरी चोर्‍यांचा छडा लागला आहे. 

याबाबत माहिती अशी, दि. 13  रोजी सकाळी 10च्या सुमारास शाहुपुरी चौकाजवळील समतापार्क परिसरात पायी चालत निघालेल्या एका धुणीभांडी काम करणार्‍या महीलेचे गळ्यातील सोन्याचे गंठण एका अनोळखी मोटारसायकस्वार इसमाने जबरदस्तीने हिसकावुन (चैन स्नॅचिंग) जबरी चोरून नेले होते. त्याबाबत शाहुपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.  शाहुपुरी पोलीस ठाण्याचे पोलीसांचे पथक घटनास्थळी भेट देवुन, फुटेज चेक करुन व माहीती घेवुन सदरचा गुन्हा उघडकीस आणणेकामी प्रयत्न करत होते. दरम्यान पोलिसांना ही जबरी चोरी मुंबईतील एका तरुणाने व सातारा येथील नातेवाईकाने संगनमताने केल्याचे माहिती मिळाली. या अनुषंगाने पथकाने अधिक माहीती संकलित करुन पोलिसांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पथक मंगळवारी सांयकाळी नवी मुंबई येथे रवाना केले. सातारा येथील दुसर्‍या डी.बी. पथकाने मुख्य आरोपीचे नातेवाईकास शोध घेवून ताब्यात घेतले. तपासामध्ये आरोपीकडुन गुन्हयात वापरलेली सी.बी.झेड इस्ट्रिम मोटारसायकल व गुन्हयातील सोन्याचे 14 मणी असा एकुण 45 हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला.

आरोपीस न्यायालयात हजर केले असता त्याची दि. 19  रोजीपर्यंत पोलीस कस्टडी रिमांड मंजुर करण्यात आली आहे. नवी मुंबई येथे गेलेल्या पथकाने स्थानिक पोलीसांचे मदतीने कोपर खैरणे भागात आरोपीचा शोध घेतला. तेथे स्थानिक अडचणींना तोंड देत संपुर्ण रात्रभर पोलीस निरीक्षक संजय पतंगे सो, स.पो.नि. विशाल वायकर यांनी वेळोवेळी दिलेल्या सुचनानुसार शोधमोहीम राबवुन सापळा लावुन पहाटे मुख्य आरोपीस ताब्यात घेतले. आरोपीस ताब्यात घेतल्यानंतर सखोल तपास केला असता त्याने नवी मुंबईमध्ये कोपर खैरणे पोलीस ठाणे हद्दीत दोन चैन स्नॅचिंगचे गुन्हे केले असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे तेथील स्थानिक पोलीसांनी दाखल चैन स्नॅचिंगचे गुन्हयात आरोपीस अटक केली आहे. त्यास आरोपीस शाहपुरीकडील चैन स्नॅचिंगचे गुन्हयात ताब्यात घेणेची प्रक्रिया सुरू आहे. 

या गुन्हयाचा तपास स.पो.नि. विशाल वायकर, स.पो.नि. संदीप शितोळे करीत आहेत. ही कारवाई जिल्हा पोलीस अधिक्षक अजयकुमार बन्सल, अप्पर पोलीस अधिक्षक धिरज पाटील, सहा.पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजय पतंगे, सहा.पोलीस निरीक्षक विशाल वायकर, संदिप शितोळे, पो.हेड.कॉ. हसन तडवी, आशिष कुमठेकर, पो.ना.लैलेश फडतरे, श्रीनिवास देशमुख, अमित माने, स्वप्निल कुंभार, पो.कॉ. पंकज मोहिते, ओंकार यादव, मोहन पवार, सचिन पवार यांनी केली आहे.


Tags: क्राइमसातारा
Previous Post

शिरवळ सरपंचाची ग्रामसभा स्थगितीची याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली

Next Post

रयत शिक्षण संस्थेत प्राध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांच्या नोकर भरतीत घोटाळा

Next Post

रयत शिक्षण संस्थेत प्राध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांच्या नोकर भरतीत घोटाळा

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

साताऱ्यात कर्मचाऱ्यांचा जल्लोष

मार्च 20, 2023

हिंदू देवस्थानांच्या जमिनी हडप करण्याचं महाराष्ट्रात षडयंत्र; राष्ट्रवादीच्या जयंत पाटलांचा खळबळजनक आरोप

मार्च 20, 2023

शेतीला चोवीस तास वीज मिळण्यासाठी प्रयत्नशील – पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित

मार्च 20, 2023

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिलं मोठं आश्वासन

मार्च 20, 2023

राहुल गांधींची माफी आणि JPC च्या मागणीवरुन आजही संसदेत गदारोळ

मार्च 20, 2023

म्हणून मी वारंवार दिल्लीला जातो, यापुढेही जात राहणार; CM शिदेंनी केला दिल्लीवारीचा खुलासा

मार्च 20, 2023

महाराष्ट्रात पर्यटनाबरोबर रोजगाराला चालना मिळेल – मंत्री मंगल प्रभात लोढा

मार्च 20, 2023

ब्रह्मगव्हाण उपसा सिंचन योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना भूसंपादनाचा मोबदला तत्काळ देण्यात यावा – मंत्री संदिपान भुमरे

मार्च 20, 2023

इकोफायचा महिंद्रा सोलाराइझसोबत सहयोग

मार्च 20, 2023

‘चला जाणूया नदीला’ अभियान देशभर जावे – राज्यपाल रमेश बैस

मार्च 20, 2023
Load More

सूचना

दैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील बातमी व जाहिराती या बातमीदाराने / जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी अथवा जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधुन अथवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे फलटण न्यायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.

  • Privacy Policy
  • Contact us

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • फलटण
  • सातारा जिल्हा
  • बारामती
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर

Website maintained by Tushar Bhambare.

Don`t copy text!