‘प्रोग्रेसिव्हच्या’ शौर्य जाधव चे राज्यस्तरीय गोळा फेक स्पर्धेत प्रथम क्रमांकासह उज्वल यश

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

दैनिक स्थैर्य । 28 नोव्हेंबर 2024 । फलटण । मुंबई येथे वाय.सी.एम.ए. आणि फिजिकल एज्युकेशन डिपार्टमेंट यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय मैदानी स्पर्धेत सरस्वती शिक्षण संस्था संचलित प्रोग्रेसिव्ह कॉन्व्हेंट स्कूल अ‍ॅण्ड ज्युनिअर कॉलेज, कोळकी, ता. फलटण येथील इयत्ता सहावी मधील विद्यार्थी कु.शौर्य किरण जाधव याने 12 वर्ष वयोगटा खालील गोळा फेक या क्रीडा प्रकारात चमकदार कामगिरी करत राज्यस्तरावर प्रथम क्रमांक मिळवून उत्तुंग यश संपादन केले आहे.

या उज्वल यशाबद्दल शौर्य व त्याच्या आई वडिलांचे सरस्वती शिक्षण संस्थेचे संस्थापक भिमराव माने, अध्यक्ष प्रदीप माने, शिक्षण संस्थेचे सचिव विशाल पवार, व्यवस्थापकीय संचालिका सौ.संध्या गायकवाड, कोषाध्यक्षा सौ.सविता माने, प्राचार्य अमित सस्ते, पर्यवेक्षक महेंद्र कातुरे, समन्वयिका सौ.माधुरी माने, सौ.सुजाता गायकवाड, सौ.अहिल्या कवितके, सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थ्यी यांनी विशेष अभिनंदन करून पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

यापुर्वीही शौर्य जाधव याने शालेय शिक्षण व क्रीडा  विभागाच्या (सातारा) वतीने घेण्यात आलेल्या शालेय क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागी होऊन तालुका व जिल्हास्तरावर थाळीफेक या प्रकारात अनुक्रमे प्रथम व द्वितीय क्रमांक प्राप्त करून चमकदार कामगिरी केली आहे.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!