शरद पवारांकडून सातारा जिल्ह्याला रेमडेसीवर लस भेट

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

स्थैर्य, सातारा, दि. १५ : कोरोनावर लस शोधण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यातीलच रेमडेसीवर ही लस प्रभावी ठरत असल्याने राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार साहेबांनी सातारा जिल्ह्यातील जनतेसाठी ही लस पाठवून दिली आहे. ती लस जिल्हावासियांना उपलब्ध व्हावी याकरता जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी पाठपुरावा केला होता.

त्यामुळे ही इंजेक्शन पवार साहेबांचे पीए स्वतः घेऊन आले. एक इंजेक्शन 35 हजार रुपयांना असून सव्वाशे इंजेक्शन जिल्हा प्रशासनाच्या ताब्यात दिली आहेत. सातारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष सुनील माने, जिल्हा सरचिटणीस राजकुमार पाटील यांनी ही इंजेक्शन क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा सर्वसाधारण रुग्णालयाचे हॉस्पिटलचे डॉ. सुधीर बक्षी, डॉ. रामचंद्र जाधव, डॉ. सुनील सोनवणे आणि फार्मासिस्ट लावंड यांच्याकडे सुपूर्द केली.

हे देखील वाचा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
कॉपी करू नका..!