हजारमाचीत रानडुकरांची शिकार करुन मांसाची विक्री; छापा टाकत चौघांना अटक


 

स्थैर्य, कऱ्हाड, दि.२५: चारहून अधिक रानडुकरांची शिकार करून त्यांचे मांस विक्री सुरू असतानाच वन विभागाने छापा टाकून संबंधितांना अटक केली. हजारमाची (ता. कऱ्हाड) येथे काल दुपारी एकच्या सुमारास छापा टाकण्यात आला. त्यात तिघांना अटक झाली आहे. या वेळी झालेल्या झटापटीत अन्य तिघे फरारी आहेत. वन विभागाने टाकलेल्या छाप्यात आठ दुचाकी, एक चारचाकीसह तिघांना पकडले. त्यासह चार रानडुकरांचे तब्बल 55 किलो मांस, तराजू, मांस कापण्यासाठी वापरलेले पाच मोठे सुरे व चार लहान चाकू जप्त केले आहेत. 

वनविभागाने दिलेल्या माहिनीनुसार, सूर्यकांत निवास जाधव ऊर्फ आबा (वय 45 रा. हजारमाची), अविनाश संपतराव पाटील ( 50, रा. गोवारे) व राजेंद्र रामचंद्र भोसले (59, रा. बुधवार पेठ, कऱ्हाड) अशी अटक झालेल्यांची नावे आहेत. त्यात सूर्यकांत ऊर्फ आबा जाधव मुख्य संशयित आहे. त्याने रान डुक्कराची शिकार करून त्याची वाहतूक केली आहे. त्याबरोबरच त्या मांसाची विक्री केली आहे. तिघांवर वन्यजीव अधिनियम अन्वये कारवाई करून अटक केली आहे. शिकार केलेल्या रानडुकराच्या मांसाची विक्री सुरू आहे, अशी माहिती वन्यजीव अपराध नियंत्रण ब्युरोचे रोहन भाटे यांना मिळाली. त्यासह त्यांनी चारपेक्षा जास्त रानडुकरांची शिकार केली आहे, अशी माहिती श्री. भाटे यांना मिळाली होती. 

आरक्षणामुळे रखडलेली शैक्षणिक प्रवेश प्रक्रिया सुरु होणार

शिकार केलेले रानडुकरांच्या मांसाची विक्री हजारमाची येथे सुरू आहे, अशी माहिती समजताच त्यांनी जिल्हा प्रमुख भारतसिंह हाडा यांना दिली. त्यांच्या आदेशानुसार वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी छापा टाकला. त्या वेळी मांसविक्री सुरू होती. छापा पडल्याचे लक्षात येताच मांसविक्री करणाऱ्यांनी झटापट सुरू केली, तरीही कारवाईत तिघांना अटक झाली. अन्य तिघे पळून गेले. कारवाईत वन्यजीव अपराध नियंत्रणचे श्री. भाटे, सहायक वनसंरक्षक किरण कांबळे, सहायक वनसंरक्षक अमरजित पवार, वनक्षेत्रपाल ए. बी. गंबरे, वनक्षेत्रपाल विलास काळे, वनपाल सवाखंडे, वनरक्षक रमेश जाधवर, वनरक्षक अरुण सोळंकी यांनी सहभाग घेतला.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!