महामार्गालगतच्या बॅटरी दुकानांत चोरट्यांचा धूडगूस; तब्बल 28 बॅटरी पळवल्या


 

स्थैर्य, उंब्रज, दि.२५: येथील महामार्गालगतच्या बॅटरी दुकान फोडून चोरट्यांनी नव्या व जुन्या अशा सुमारे 50 हजार रुपये किमतीच्या 28 बॅटरी चोरल्या. सोमवारी रात्री उशिरा घटना घडली असून, काल सकाळी उघडकीस आली. रहदारीच्या ठिकाणचे दुकान फोडल्याने आश्‍चर्य व्यक्त होत आहे. 

पोलिस व घटनास्थळावरील माहिती अशी, महामार्गालगत पेट्रोल पंपाशेजारी सुपेरिअर बॅटरीच्या विक्री व दुरुस्तीचे दुकान आहे. मूळचे केरळ मात्र व्यवसायासाठी येथे स्थायिक असलेले जॉय अण्णा यांनी रात्री दुकान नेहमीप्रमाणे दुकान बंद करून ते घरी गेले होते. सकाळी त्यांना दुकान उघडण्यापूर्वीच चोरट्यांनी ते फोडल्याचे त्यांना समजले. त्यानंतर जॉय अण्णा यांनी पोलिसात धाव घेतली. तेथे चोरीची माहिती दिली. 

हजारमाचीत रानडुकरांची शिकार करुन मांसाची विक्री; छापा टाकत चौघांना अटक

पहाटे बंद दुकानाचे कुलूप कटरने तोडून चोरटे दुकानात शिरले असावेत, असा अंदाज आहे. दुकानातील एक्‍साइड, एसएसएफ, फ्रीडम कंपनीच्या नवीन आणि दुरुस्तीला ठेवलेल्या बॅटऱ्यासहीत नादुरुस्त अशा 28 बॅटऱ्या चोरट्यांनी लंपास केल्या आहेत. सुपेरियर बॅटरीचे दुकान पेट्रोल पंपानजीक सेवा रस्त्यालगत आहे. येथे 24 तास रहदारी असते, तरीही चोरट्यांनी हे दुकान फोडून तब्बल 28 बॅटरी चोरून नेण्याचे धाडस केल्याने आश्‍चर्य व्यक्त होत आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!