दैनिक स्थैर्य | दि. ७ फेब्रुवारी २०२४ | बारामती |
पुणे जिल्हा व्यापार व उद्योग सेलच्या उपाध्यक्षपदी बारामती एमआयडीसी येथील उद्योजक राजाराम सातपुते व सरचिटणीसपदी प्रवीण जगताप यांची निवड करण्यात आली.
बारामतीमध्ये रविवार, दि. ४ फेब्रुवारी रोजी झालेल्या व्यापारी मेळाव्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते सदर निवडीचे पत्र देण्यात आले. याप्रसंगी पुणे जिल्हा व्यापार व उद्योग सेलचे अध्यक्ष नितीन गुरव, जिल्हा कार्याध्यक्ष पंकज सावंत, शहर अध्यक्ष वैभव शिंदे व राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष संभाजी होळकर, शहर अध्यक्ष जय पाटील, बारामती बँक चेअरमन सचिन सातव व बारामती इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट असोसिएशनचे अध्यक्ष धनंजय जामदार उपस्थित होते.
बारामती एमआयडीसी येथे व्ही. आर. बॉयलर सोल्युशनच्या माध्यमातून राजाराम सातपुते हे कार्यरत असून मराठा सिक्युरिटी एजन्सीच्या माध्यमातून प्रवीण जगताप काम करतात. अनेकांना रोजगार निर्मिती व उद्योजक म्हणून उल्लेखनीय कार्य करून सुशिक्षित बेरोजगार यांना मार्गदर्शन करतात. त्यांच्या कार्याची दखल घेऊन निवड करण्यात आलेली आहे.
उद्योजक होऊ इच्छिणार्यांना व तरुण उद्योजकांना शासनाच्या विविध उपक्रमांची माहिती देऊन पक्षाच्या आदेशानुसार कार्य करणार असल्याचे राजाराम सातपुते व प्रवीण जगताप यांनी यावेळी सांगितले.