![](https://i0.wp.com/sthairya.com/wp-content/uploads/2025/01/Robotic.jpg?resize=709%2C354&ssl=1)
दैनिक स्थैर्य | दि. १० जानेवारी २०२५ | फलटण |
श्रीराम एज्युकेशन सोसायटी फलटण, यशवंतराव चव्हाण हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज फलटण, सौ. वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज फलटण व एअर गुरुजी इंटरनॅशनल यांच्या संयुक्त विद्यमाने आज, शुक्रवार, दि. १० जानेवारी रोजी फलटण तालुक्यातील पहिले कृत्रीम बुध्दिमत्ता (आर्टिफिशियल इंटेलिजिन्स) कोडींग, ड्रोन, रोबोटिक्स क्षेत्रातील भव्य विज्ञान आणि तंत्रज्ञान प्रदर्शन २०२५ आयोजित केले आहे.
हे प्रदर्शन यशवंतराव चव्हाण हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, फलटण येथे होणार असून प्रदर्शनाची वेळ सकाळी १०.०० ते सायं. ४.०० वाजेपर्यंत असून प्रदर्शनाचे उद्घाटन आज सकाळी सकाळी ११ वाजता मान्यवरांच्या हस्ते होणार आहे.
उद्घाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीमती सविता सुभाषराव सूर्यवंशी (बेडके), अध्यक्षा श्रीराम एज्युकेशन सोसायटी, फलटण या असून प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. सचिन सुभाषराव सूर्यवंशी (बेडके) ऑनररी जनरल सेक्रेटरी श्रीराम एज्युकेशन सोसायटी, फलटण, सौ. प्रभावती कोळेकर, शिक्षणाधिकारी (माध्य.जि.प.सातारा), अनिस नायकवडी, शिक्षणाधिकारी (योजना जि.प.सातारा) हे उपस्थित राहणार आहेत.
यावेळी सौ. शबनम मुजावर, शिक्षणाधिकारी (प्राथ. जि.प.सातारा), प्रताप पवार, श्रीराम एज्युकेशन सोसायटी फलटणच्या नियामक मंडळातील उपाध्यक्ष व सर्व सदस्य, प्राचार्य सौ. वेणुताई चव्हाण गर्ल्स हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, फलटण हे उपस्थित राहणार आहेत.