![](https://i0.wp.com/sthairya.com/wp-content/uploads/2025/01/Bhoite-1.jpg?resize=709%2C354&ssl=1)
दैनिक स्थैर्य | दि. १० जानेवारी २०२५ | फलटण |
कै. नरसिंगराव (आप्पा) खाशाबा भोईटे यांच्या पुण्यतिथीनिमित्त मोफत मोतिबिंदू शस्त्रक्रिया व मोफत चष्मेवाटप शिबिराचे उद्घाटन आ. सचिन पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. हे शिबिर वाघोली, ता. कोरेगाव, जि. सातारा येथे संपन्न झाले.
कै. नरसिंगराव आप्पा यांनी सुरू केलेला हा उपक्रम त्यांचे चिरंजीव डॉ. विठ्ठल भोईटे यांनी भविष्यात सुरू ठेवून मोठे समाजकार्य अखंडितपणे चालू ठेवावे, अशा शुभेच्छा आ. सचिन पाटील यांनी यावेळी दिल्या.
या शिबिरात मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यासाठी सांगली जिल्हा नेत्र रुग्णालय येथे अनेक रुग्ण बसने पाठविण्यात आले. यावेळी सातारा जिल्हा शासकीय रुग्णालयाचे मुख्य सर्जन डॉ. युवराज करपे, डॉ. कणसे, डॉ. विठ्ठल भोईटे, डॉ. लिपारे, पुणे महानगरपालिकेचे नगरसेवक राजेंद्र शिलीमकर, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य दत्तात्रय धुमाळ, वाघोलीच्या सरपंच सौ. अमिताताई भोईटे, उपसरपंच सौ.धायगुडे, पिंपोडे बु.च्या सरपंच सौ. दिपिका लेंभे, शहाजी भोईटे, अमित रणवरे, दिपक पिसाळ, पोपट पिसाळ, सोसायटीचे चेअरमन सूर्यकांत निकम, सागर लेंभे, मनोज अनपट, राजेंद्र धुमाळ, सतीश धुमाळ, शिवजी भोईटे, योगेश करपे व नेत्रतज्ज्ञ डॉक्टर्स व मोठ्या प्रमाणात रुग्ण उपस्थित होते.
या शिबिराचा ७४० रुग्णांनी लाभ घेतला तसेच मोतीबिंदू शस्त्रक्रियेकरिता एकूण २७ रुग्ण सांगली येथे पाठविले.