जिल्हा परिषद विषय समिती निवडी बिनविरोध; सत्ताधारी-विरोधक एकत्र, फलटणच्या सदस्यांना महत्त्वपूर्ण समित्यांवर संधी!


सातारा जिल्हा परिषदेच्या १० विषय समित्यांच्या ८३ जागांसाठी झालेल्या निवडीत सत्ताधारी व विरोधक एकत्र आल्याने निवडणूक बिनविरोध पार पडली. यात फलटण तालुक्यातील सदस्यांची महत्त्वपूर्ण समित्यांवर वर्णी लागली आहे.

स्थैर्य, फलटण, दि. 18 एप्रिल : जिल्हा परिषदेच्या विषय समिती सदस्य निवडीत अनपेक्षित राजकीय घडामोडी पाहायला मिळाल्या. सत्ताधारी आणि विरोधकांनी एकत्र येत समजोता केल्याने भाजपला ४३ तर राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना व काँग्रेस आघाडीला ४० सदस्य दिल्याने या निवडी बिनविरोध पार पडल्या आहेत.

या प्रक्रियेत १० समित्यांच्या एकूण ८३ जागांवर ६५ जिल्हा परिषद सदस्य आणि ११ पंचायत समितीचे सभापती यांची वर्णी लागली आहे. तर, सात सदस्यांना दोन समित्यांवर काम करण्याची संधी मिळाली आहे. या सर्व समित्यांमध्ये फलटण तालुक्यातील सदस्यांना महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या मिळाल्या आहेत.

फलटण तालुक्यातील सदस्यांची वर्णी :

फलटणमधील राजे गट (शिवसेना) आणि खासदार गट (भाजपा) या दोन्ही गटांच्या सदस्यांना खालील विविध समित्यांमध्ये संधी मिळाली आहे:

  • गिरीश बनकर (शिवसेना – राजे गट) : जलव्यवस्थापन व स्वच्छता समिती

  • रुपाली सरगर (शिवसेना – राजे गट) : समाजकल्याण समिती आणि अर्थ समिती

  • वैशाली कांबळे (शिवसेना – राजे गट) : समाजकल्याण समिती

  • ऋतुजा जगताप (भाजपा – खासदार गट) : समाजकल्याण समिती आणि बांधकाम समिती

  • विष्णुपंत लाेखंडे (भाजपा – खासदार गट) : समाजकल्याण समिती आणि पशुसंवर्धन व दुग्धशाळा समिती

  • सौ. किरण नलवडे (भाजपा – खासदार गट) : शिक्षण व क्रीडा समिती

  • सह्याद्री कदम (शिवसेना – राजे गट) : बांधकाम समिती

  • कु. शिवांजली भोसले (सभापती, पं.स. फलटण – भाजपा खासदार गट) : आरोग्य समिती

समितीनिहाय निवड झालेल्या सदस्यांची संपूर्ण यादी खालीलप्रमाणे:

  • जिल्हा परिषद स्थायी समिती: कामेश कांबळे, उदय कबुले, अशोक पाटील, वसंतराव मानकुमरे, सागर शिवदास, धनंजय चव्हाण, अनिल देसाई, उदयसिंह पाटील.

  • जलव्यवस्थापन व स्वच्छता समिती: गिरीश बनकर (शिवसेना – राजे गट, फलटण), राजेश पवार, माधवराव काळभोर, विद्या वेताळ, जयश्री भोसले, सुनंदा पाटील.

  • कृषी समिती: विजया कुंभार, अजित संकपाळ, सर्जेराव सावंत, धनंजय ताटे, हणमंतराव जगदाळे, रणजित जाधव, दिलीप बाबर, शुभांगी जाधव, दिनकर शिंदे, संतोष साळुंखे.

  • समाजकल्याण समिती: रुपाली सरगर (शिवसेना – राजे गट, फलटण), वैशाली कांबळे (शिवसेना – राजे गट, फलटण), शितल रणपिसे, संजय केळगणे, ऋतुजा जगताप (भाजपा – खासदार गट, फलटण), ॲड. सुरज पाटील, जयश्री गिरी, विष्णुपंत लाेखंडे (भाजपा – खासदार गट, फलटण), संदीप मांडवे, वनिता दुबळे, मनिषा पाटील.

  • शिक्षण व क्रीडा समिती: कविता ओंबळे, स्पप्ना पाटील, अमित चव्हाण, सौ. किरण नलवडे (भाजपा – खासदार गट, फलटण), सुरज पाटील, अजित साळुंखे, मनिला फडतरे, विक्रम शिंगाडे.

  • बांधकाम समिती: सह्याद्री कदम (शिवसेना – राजे गट, फलटण), योगिता गिरी, सोनल गोरे, हणमंत जगदाळे, ऋतुजा जगताप (भाजपा – खासदार गट, फलटण), सौरभ शिंदे, राजेंद्र शेळके, सोनाली पोळ.

  • अर्थ समिती: रुपाली सरगर (शिवसेना – राजे गट, फलटण), ज्योती मोरे, सारिका फाळके, अजित साळुंखे, मनिषा पाटील, विक्रांत डोंगरे, वृषाली चव्हाण.

  • पशुसंवर्धन व दुग्धशाळा समिती: सुनिता फाळके, सविता पवार, दिलीप बाबर, महेश गाडे, नंदाताइ यादव, रणजित जाधव, विष्णुपंत लाेखंडे (भाजपा – खासदार गट, फलटण), रुपाली गुरव.

  • आरोग्य समिती: प्रियांका साळुंखे, लालासाहेब जगदाळे, निता खरात, कु. शिवांजली भोसले – सभापती, फलटण पंचायत समिती (भाजपा – खासदार गट, फलटण), जयश्री गिरी, राजेश्वरी भोसले, संध्याराणी भोसले – पाटील, शकुंतला चोरमले.

  • महिला व बालकल्याण समिती: मृणाल पाटील, शैलजा शिंदे, सारिका फाळके, अलका जगदाळे, पूजा मोरे, विजया थोरात, छाया जाधव, राजेश्वरी भोसले.


Back to top button
Don`t copy text!