
थेट WhatsApp वर मिळवा
सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालकपदी रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची बिनविरोध निवड झाली असून फलटणमध्ये फटाके फोडून व पेढे वाटून जल्लोष करण्यात आला.
स्थैर्य, फलटण, दि. २१ ऑक्टोबर : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची बिनविरोध निवड झाली आहे. या निवडीची घोषणा होताच फलटण शहरात कार्यकर्त्यांनी फटाक्यांची जोरदार आतिशबाजी करत आणि पेढे वाटून मोठा आनंदोत्सव साजरा केला.
राजभवनात अभिनंदन आणि जल्लोष
रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या फलटण येथील राजभवन या निवासस्थानी कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. सातारा जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य ॲड. सौ. जिजामाला नाईक निंबाळकर यांना पेढे भरवून त्यांचे अभिनंदन करण्यात आले. सहकार क्षेत्रातील या विजयामुळे समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.
रणनीतीतून वर्चस्व सिद्ध
लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभा, जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपरिषद निवडणुकीत अचूक रणनीती आखत पक्षाने यश मिळवले होते. आता जिल्ह्याच्या सहकार क्षेत्रातील सर्वोच्च सत्ताकेंद्र असलेल्या जिल्हा बँकेत रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी बिनविरोध प्रवेश केल्याने त्यांच्या नेतृत्वावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले आहे.





