सातारा जिल्हा बँक निवडणूक; फलटण सोसायटीत समशेरसिंह विरुद्ध संजीवराजे थेट लढत

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

फलटण तालुका सोसायटी मतदारसंघात समशेरसिंह नाईक निंबाळकर विरुद्ध संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्यात थेट लढत रंगणार असून १३० मतांसाठी मोठी चुरस निर्माण झाली आहे.

स्थैर्य, फलटण, दि. २१ ऑक्टोबर : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत फलटण तालुका सोसायटी मतदारसंघात हाय व्होल्टेज लढत निश्चित झाली आहे. या मतदारसंघात फलटणचे नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर आणि जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्यात थेट समोरासमोर लढत होणार असल्याने जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

१३० मते आणि विजयाचे गणित

सोसायटी मतदारसंघांमध्ये अवघे १३० मतदार असल्याने निवडणुकीत चुरस वाढली आहे. विजयासाठी ६५ पेक्षा अधिक मते मिळवणे आवश्यक असल्याने प्रत्येक मताला प्रचंड महत्त्व आले आहे. दोन्ही उमेदवारांकडून एकेका मताची जुळवाजुळव करण्यासाठी रणनीती आखली जात आहे.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!