
थेट WhatsApp वर मिळवा
अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्था, नाशिक यांच्या फलटण शाखेच्या वतीने ‘दिवाळी पहाट’ या संगीतमय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, संगीतप्रेमींसाठी ही मोठी पर्वणी ठरणार आहे.
स्थैर्य, फलटण, दि. ०६ नोव्हेंबर : अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्था, नाशिक यांच्या फलटण शाखेच्या वतीने दीपावलीनिमित्त ‘दिवाळी पहाट’ या विशेष संगीतमय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ‘स्वरयात्री’ या संकल्पनेवर आधारित हा कार्यक्रम ७ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ६:३० वाजता नवलबाई मंगल कार्यालय, मारवाड पेठ येथे रंगणार असून, संगीतप्रेमींसाठी ही एक उत्तम पर्वणी असणार आहे.
सुमधुर गीतांचा सुरेल
संगम ज्ञानाचा, प्रकाशाचा, मांगल्याचा आणि नवनिर्मितीचा उत्सव असलेल्या दीपावलीची सुरुवात या संगीतमय कार्यक्रमाने होणार आहे. शिवाजी सुतार आणि त्यांचे सहकारी या कार्यक्रमात सुमधुर मराठी भावगीते, भक्तिगीते आणि अभंग सादर करणार आहेत. जोशी हॉस्पिटल प्रायव्हेट लिमिटेड आणि उषःकाल प्रतिष्ठान, फलटण यांनी या कार्यक्रमाचे प्रायोजकत्व स्वीकारले आहे.
धन्वंतरी पुरस्काराचे वितरण
या संगीतमय कार्यक्रमासोबतच डॉ. जयंत जगदाळे यांना ‘धन्वंतरी पुरस्कार’ प्रदान करून सन्मानित केले जाणार आहे. दीपावलीचा हा आनंद द्विगुणित करण्यासाठी नागरिकांनी सहकुटुंब आणि सहपरिवार या कार्यक्रमाला उपस्थित राहावे, असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.





