सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू अवतरण दिन अष्टशताब्दी वर्ष


स्थैर्य, फलटण, दि. २१ : महाराष्ट्रातील पहिला आद्य गद्य ग्रंथ तो म्हणजे लीळाचरित्र .ज्ञानेश्वरीच्या आधी 4 वर्ष हा लीळाचरित्र ग्रंथ 1208 मध्ये लिहल्या गेला.ह्या ग्रंथाचे लेखक आचार्य पंडित माहिमभट्ट हे आहेत .मराठीतील पहिली कवयित्री कोण असेल तर ती आहे महादाईसा . महदंबेचे धवळे हा काव्य प्रकार आज ही बी.एड.ला अभ्यासक्रमात आहे आज ही ह्या ग्रंथातील दृष्टांत उदा.आधारियेच्या परिसाचा  दृष्टांत तसेच उदा.नरेंद्रबासा भेटी अनुसरण .असे अनेक विविध पाठ माध्यमिक विद्यालयात पाठय पुस्तकात आपल्याला पाहायला मिळेल लीळाचरित्र हा ग्रंथ आध्यात्मिक तर आहेच अलौकिक पण आहे . तसेच इथे लौकिक जीवनाचे दर्शन ही या ग्रंथात आपल्याला पहायला मिळते .प्राचीन मराठी गद्यांची शब्दसंपत्ती ,व्याकरण, म्हणी,वाक्यरचना इत्यादी अनेक वेगवेगळ्या दृष्टीने या ग्रंथाचा अभ्यास करता येतो.असा हा ग्रंथ गद्यग्रंथ म्हणून उपयोगाचा न्हवे तर साहित्याच्या दृष्टीने ही तो फार महत्वाचा आहे .मराठी कथा वाङ्मयाची बीजे शोधण्याच्या दृष्टीने ही त्याचा उपयोग आहे . श्री चक्रधरांनी सारंगपंडितांच्या मुलीला म्हणजे धानाईसाला काऊळ्याचे घर शेनाचे साळेचे घर मेणाचे ही बालकथा सांगून तीच रडणं स्वामी थांबवतात .अश्या अनेक बालकथा प्रौढांकरिता लोककथा ही ह्या ग्रंथात आपल्याला पाहायला मिळतात .त्यावेळेच्या अनेक गावांची नद्यांची देवळांची देवतेंच्या माहिती ही आपल्याला ह्या ग्रंथात पाहायला मिळतात.

श्री चक्रधरांचे परिभ्रमण महाराष्ट्रात सर्व स्थरातील जनतेशी होता.

त्यावेळी स्वामींचा राजकीय ,सामाजिक व धार्मिक परस्थिती चे प्रतिबिंब या ग्रंथातून दिसते .निरनिराळे धर्मपंथ त्यांची मतमतांतरे,त्या वेळच्या सामाजिक परिस्थिती चे दर्शन घडविणारा हा ग्रंथ आहे .

निरनिराळे खेळ,व्यवसाय,शेती, शेतीची अवजारे, फळे भाज्या,घरे त्यांची मांडणी स्वयंपाक घरात तयार होणारे पक्वान्न ही माहिती आम्हाला या ग्रंथातून मिळते .या ग्रंथाचे लेखन वऱ्हाडात झाले .लीळाचरित्र चे नायक हे स्वामी श्री चक्रधर आहेत.लीळा म्हणजे परमेश्वराने केलेल्या क्रीडा आणि चरित्र म्हणजे भक्तांच्या सोबत घडलेल्या लीला असे म्हणून ह्या ग्रंथाला लीळाचरित्र असे म्हंटले आहे .या ग्रंथात आपल्याला अनेक वेगवेगळ्या प्रकारचे दृष्टांत स्वामींनी सांगितलेले आपल्याला पाहायला मिळते . ज्या त्या प्रसंगावरून स्वामींनी सूत्रांचा ही उच्चार केलेला आपल्याला पाहायला या ग्रंथात मिळते . सूत्र हा महानुभवांचा आत्मा च आहे.  अश्या ह्या महानुभाव पंथाचा विचार संपूर्ण भारतभर च न्हवे देश विदेशात ही ह्या संप्रदायाचे अनुयायी आहेत .आज ही हा संप्रदाय जातीभेद मानत नाही इथे सर्व स्थरातील सर्व जातीतील लोकांना प्रवेश असतो. आज या युगावतार पूर्ण परब्रम्ह परमेश्वर सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंचे अष्टशताब्दी वर्ष या दिवशी स्मरण म्हणून छोटासा विचार अपल्या पर्यंत पोहचविण्याचा मानस…..

…………श्यामसुंदर जामोदेकर महानुभाव फलटण


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!