
थेट WhatsApp वर मिळवा
मोगराळे घाटमाथ्यावर हॉटेल संयोग फॅमिली रेस्टॉरंट आणि संयोग पेट्रोलियम पेट्रोल पंपाचे शानदार उद्घाटन पार पडले. प्रवाशांना दर्जेदार सुविधा मिळणार.
स्थैर्य, मोगराळे, दि. १३ नोव्हेंबर : मोगराळे (ता. माण) येथे पोपटराव जगदाळे यांच्या ‘हॉटेल संयोग फॅमिली रेस्टॉरंट’ आणि ‘संयोग पेट्रोलियम’ या इंडियन ऑइल पेट्रोल पंपाचे शानदार उद्घाटन ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे व माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या हस्ते पार पडले. यावेळी जगदाळे कुटुंबीयांना त्यांच्या या नव्या व्यावसायिक वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या.
प्रवाशांसाठी नव्या सुविधा
गेल्या अनेक वर्षांपासून फलटण शहरात हॉटेल व्यवसायाच्या माध्यमातून ग्राहकांना उत्तम सेवा देणाऱ्या जगदाळे कुटुंबीयांनी आता व्यवसायाचा विस्तार केला आहे. मोगराळे घाटमाथ्यावर हॉटेल व्यवसायासह इंडियन ऑइल पेट्रोल पंपाच्या माध्यमातून नवा व्यवसाय सुरू केला आहे. त्यांच्या या नव्या व्यावसायिक उपक्रमामुळे परिसरातील नागरिक, प्रवासी आणि वाहनधारकांना दर्जेदार सुविधा उपलब्ध होणार आहेत, असे मत मंत्री गोरे यांनी व्यक्त केले.
मान्यवरांची उपस्थिती
या उद्घाटन प्रसंगी माढा लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर, उद्योजक अंकुश गोरे, पंचायत समिती सदस्य संजय भोसले, मामूशेठ वीरकर यांच्यासह फलटण व माण तालुक्यातील विविध क्षेत्रांतील पदाधिकारी, मान्यवर आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.





