दैनिक स्थैर्य | दि. १९ ऑगस्ट २०२४ | फलटण |
निरगुडी गावातील महात्मा फुले नगरमधील होलार समाज बांधव व भैरवनाथ तरुण मंडळाच्या वतीने निरगुडी गावचे सुपुत्र संकेत माने यांची कोल्हापूर पोलिस (एसआरपीएफ) पदी नियुक्ती झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.
एका गरीब कुटुंबातील मुलगा पोलिस झाला म्हणून महात्मा फुले नगरमधील भैरवनाथ तरुण मंडळाच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी संकेत माने यांच्यावर अभिनंदनाचा आणि कौतुकाचा वर्षाव केला केला तसेच पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
प्रास्ताविक सामाजिक कार्यकर्ते महेंद्र गोरे यांनी केले. आभार पत्रकार सूरज गोरे यांनी मानले.
सत्कारमूर्ती संकेत माने, मंडळाचे संस्थापक महादेव गोरे, माजी अध्यक्ष तानाजी गोरे, युवक नेतृत्व निलकुमार गोरे, अध्यक्ष अजित गोरे, उपाध्यक्ष भिकाजी गोरे, खजिनदार अजित रोहिदास गोरे, देवराज गोरे यांनी यावेळी मनोगते व्यक्त केली.
यावेळी अक्षय माने, अभिजीत गोरे, सुनिल गोरे, मा. व्हा. चेअरमन रघुनाथ गोरे, नानाजी गोरे, रणजित गोरे, अक्षय आवटे, अमित आवटे, आदेश गोरे, विघ्नेश गोरे, आदित्य गोरे, जयकुमार गोरे, अंकुश गोरे, सौ. प्रमिला गोरे, सौ.सोनाली गोरे तसेच महात्मा फुले नगरमधील होलार समाज बांधव आणि महिला वर्ग उपस्थित होता.