दैनिक स्थैर्य | दि. १९ ऑगस्ट २०२४ | फलटण |
फलटण एज्युकेशन सोसायटीच्या मुधोजी हायस्कूलमध्ये भारतीय स्वातंत्र्य दिनाचा ७८ व्या वर्धापन दिन फलटण एज्युकेशन सोसायटीचे नियमक मंडळाचे उपाध्यक्ष श्री. अशोक जीवराज दोशी यांच्या हस्ते ध्वजारोहणाने संपन्न झाला.
यावेळी फलटण एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे व्हाईस चेअरमन रमणलाल दोशी, सदस्य शिरीष दोशी, नितीन गांधी, शिरिष उर्फ संजय भोसले, चंद्रकांत पाटील, सौ. नूतन शिंदे, सौ. वसुंधरा नाईक निंबाळकर, प्रशासन अधिकारी अरविंद निकम, तपासणी अधिकारी दिलीप राजगुडा, माजी प्राचार्य अर्जुन रूपनवर, बाबासाहेब गंगवणे, काकडे सर, उद्योजक नामदेवराव जाधव, विद्यालयाचे प्राचार्य सुधीर अहिवळे, माध्यमिक विभागाचे उपप्राचार्य नितीन जगताप, ज्युनिअर कॉलेजचे उपप्राचार्य सोमनाथ माने, पर्यवेक्षिका सौ. पूजा पाटील, किमान कौशल्य विभागाचे प्रमुख रणसिंग सर आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी ध्वजारोहणाची ऑर्डर बी. बी. खुरंगे यांनी दिली तर राष्ट्रगीताचे संगीतबद्ध तालासुरात गायन नेरकर सर, अमोल रणवरे व सौ. वनीता लोणकर व प्रशालेच्या विद्यार्थिनींनी केले. यावेळी एनसीसी विभागप्रमुख दीपक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली एनसीसी कॅडेटच्या वतीने प्रमुख पाहुण्यांना परेड रूपाने मानवंदना देण्यात आली. तसेच सर्व विद्यार्थ्यांना शपथ देण्यात आली व कार्यक्रम संपल्यानंतर जिलेबी व केळीचे वाटप करण्यात आले.
यावेळी विद्यालयातील १० वीमध्ये प्रथम ३ क्रमांक आलेल्या व १२ वी वाणिज्य, विज्ञान व कला शाखेतील तसेच अकाउंटिंग, फायनान्शिअल ऑफिस मॅनेजमेंट, बँकिंग फायनान्शिअल सर्विसेस, इन्शुरन्स, मेडिकल लॅबोरेटरी टेक्निशियन व विविध बाह्य परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. कॅनरा बँकेमार्फत मायनर विद्यार्थ्यांसाठी दिली जाणारी ३०० रुपये शिष्यवृत्ती यावेळी प्रदान करण्यात आली.