संजय राऊत यांनी पात्रतेपेक्षा अधिक बोलू नये !- राधाकृष्ण विखे पाटील ​​​​​​​

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

दैनिक स्थैर्य । दि. १५ मे २०२३ । नाशिक । शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाबाबत राज्य सरकारवर केलेल्या आरोपांमधून संजय राऊत हे केवळ पोपटपंची करीत आहेत. त्यांना तसे बोलण्याची जबाबदारीच त्यांच्या पक्षाने दिली आहे. मात्र, विधाने करताना त्यांनी आपल्या पात्रतेपेक्षा अधिक बोलू नये, असा शाब्दीक आसूड भाजपाचे नेते आणि महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी ओढले.

विखे पाटील हे शनिवारी विविध कार्यक्रम आणि भाजपाच्या संघटनात्मक बैठकांच्या निमित्ताने नाशिक दौऱ्यावर होते. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालांसंदर्भात राऊत यांनी नाशिकमध्ये केलेल्या विधानांच्या पार्श्वभूमीवर विचारणा झाली असता त्यांच्या सारख्या भाडोत्री माणसावर काय भाष्य करणार असे म्हणत त्यांच्या विधानांवर कोरडे ओढले. राऊत काहीही म्हटले तरीही राज्यातील सरकार पडणार नाही. राऊत यांची भविष्यवाणी कधीही खरी झालेली नाही. त्यामुळे त्यांच्याकडे दुर्लक्ष करा. पुढे जाऊन त्यांचा पक्ष त्यांच्याबाबत काय करेल काही सांगता येत नाही. ते वैफल्यग्रस्त झाले असून या माणसाच्या डोक्यावर काही दिवसांनी परिणाम झालेला दिसेल, असे सांगत त्यावर अधिक भाष्य करण्यास नकार दिला.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!