सांगवीच्या ग्रामविकास अधिकार्‍यास शिवीगाळ, दमदाटी; एकावर गुन्हा दाखल

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य | दि. १९ मे २०२३ | फलटण |
सांगवी (ता. फलटण) येथे ग्रामपंचायतीतील ग्रामविकास अधिकार्‍यास शिवीगाळ, दमदाटी करून शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी राहुल हनुमंत चव्हाण (रा. सांगवी) याच्यावर फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, दि. १८ मे २०२३ रोजी सकाळी १०.३० वाजण्याच्या सुमारास आरोपी राहुल हनुमंत चव्हाण (रा. सांगवी) हा ग्रामपंचायत कार्यालय सांगवीमध्ये येऊन त्याने ग्रामविकास अधिकारी गणेश दादासो दडस (रा. धूळदेव) यांना ‘माझी रस्त्याची अडचण तुम्ही का सोडवली नाही’, असे म्हणून त्यांना शिवीगाळ, दमदाटी केली व ऑफिसच्या बाहेर निघून गेला. त्यानंतर पुन्हा आरोपी ऑफिसमध्ये येऊन फिर्यादीची कॉलर धरून फिर्यादी हे शासकीय काम करीत असताना फिर्यादीचे शासकीय कामात अडथळा आणला म्हणून पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

या प्रकरणी पोलिसांनी राहुल चव्हाण याच्याविरोधात गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक आरगडे करत आहेत.


Check Also
Close
Back to top button
Don`t copy text!