संगीनी फोरमने केला लेफ्टनंट प्रसाद नाळे यांचा सत्कार

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. ८ फेब्रुवारी २०२४ | फलटण |
फलटणनजीक कोळकी वनदेवशेरी येथील चि. प्रसाद नाळे यांनी युपीएससी मार्फत भारतीय सैन्य दलात लेफ्टनंट पदावर आपले नाव कोरले. फलटण नगरीच्या सुपुत्राच्या उज्ज्वल यशाबद्दल संगिनि फोरम, फलटणने शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह देऊन चि. प्रसाद नाळे यांचा यथोचित सत्कार केला.

यावेळी चि. प्रसाद नाळे यांच्या प्राथमिक शिक्षिका व संगीनि सदस्या ममता शहा यांचाही संगीनि फोरमकडून सत्कार करण्यात आला. यावेळी संगिनी अध्यक्षा अपर्णा जैन, सचिव प्रज्ञा दोशी, खजिनदार मनिषा घडिया, माजी सचिव दिप्ती राजवैद्य, पोर्णिमा शहा, संगिनी सदस्या जयश्री उपाध्ये, दिपिका व्होरा तसेच डॉ. नाळे उपस्थित होत्या.

सत्काराबद्दल प्रसाद नाळे यांनी संगीनी फोरमला धन्यवाद देऊन आपल्या शैक्षणिक प्रवासाबद्दल मनोगत व्यक्त करून आपले आजी-आजोबा, आई-वडिल, चुलते-चुलती व शिक्षकांचे मार्गदर्शन व प्रेरणेमुळे यश संपादन केल्याचे प्रतिपादन केले.

संगिनी अध्यक्षा अपर्णा जैन यांनी प्रसाद नाळे यांचे यश भावी तरुण पिढीला निश्चितच मार्गदर्शक व प्रेरणादायी असल्याचे सांगून प्रसाद नाळे यांना भावी कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या. दिप्ती राजवैद्य यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले.


Back to top button
Don`t copy text!