खासदार रणजितसिंह यांच्यासाठी समशेरसिंह यांचा शहरात झंझावात : अनुप शहा

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

दैनिक स्थैर्य | दि. 16 एप्रिल 2024 | सातारा | माढा लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार तथा फलटणचे सुपुत्र रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचारार्थ नगरपरिषदेचे माजी विरोधी पक्ष नेते समशेरसिंह नाईक निंबाळकर यांनी फलटण शहरात प्रचाराचा झंझावात उभा केला आहे. फलटण शहरात प्रत्येक प्रभागात प्रचार दौरा नगरपरिषदेचे माजी विरोधी पक्ष नेते समशेरसिंह नाईक निंबाळकर हे करीत आहेत; असे मत भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष अनुप शहा यांनी व्यक्त केले.

फलटण शहरासह तालुक्यामधील नागरिकांनी काम करीत असताना गट, तट, पक्ष विरहित एकत्र येऊन आपल्या फलटणच्या सुपुत्राला निवडून देण्यासाठी कामकाज करणे आवश्यक आहे. फलटण शहरासह तालुक्यातून खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना मोठ्या मताधिक्याने आपण सर्वांनी पुन्हा एकदा लोकसभेवर पाठवू; असेही समशेरसिंह यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!