भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त विधानभवनात अभिवादन

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

दैनिक स्थैर्य । दि. ०७ डिसेंबर २०२२ । मुंबई ।

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त विधानभवनाच्या प्रांगणात असलेल्या त्यांच्या पुतळ्यास विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर व विधानपरिषदेच्या उप सभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी पुष्पहार व गुलाबपुष्प अर्पण करुन आदरांजली वाहिली.

याप्रसंगी विधानमंडळ सचिवालयाचे प्रधान सचिव राजेंद्र भागवत, उप सचिव विलास आठवले, राजेश तारवी, नागनाथ थिटे, अध्यक्षांचे सचिव महेंद्र काज, उप सभापती, विधानपरिषद यांचे खासगी सचिव तथा जनसंपर्क अधिकारी रविंद्र खेबुडकर, अवर सचिव रविंद्र जगदाळे, वि.स.पागे संसदीय प्रशिक्षण केंद्राचे संचालक आणि जनसंपर्क अधिकारी निलेश मदाने आदींसह अन्य अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!