नवी दिल्ली येथे बाळशास्त्री जांभेकर जयंतीनिमित्त अभिवादन

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

दैनिक स्थैर्य । दि. २१ फेब्रुवारी २०२३ । नवी दिल्ली । आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती नवी दिल्ली येथील महाराष्ट्र सदन आणि महाराष्ट्र परिचय केंद्रात साजरी करण्यात आली.

कोपर्निकस मार्ग स्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात प्रभारी निवासी आयुक्त डॉ. निधी पांडे यांनी बाळशास्त्रींच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. सहायक निवासी आयुक्त डॉ. राजेश अडपावार यांच्यासह महाराष्ट्र सदनच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी बाळशास्त्रींच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

महाराष्ट्र परिचय केंद्रात आयोजित कार्यक्रमात बाळशास्त्रींना अभिवादन करण्यात आले. परिचय केंद्राच्या प्रभारी उपसंचालक (माहिती) अमरज्योत कौर अरोरा यांच्यासह कर्मचाऱ्यांनी बाळशास्त्रींच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!