सद्गुरू पतसंस्था आणि महाराजा मल्टीस्टेटच्या सभासदांना लाभांश व कर्मचाऱ्यांना बोनस जाहीर

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

श्री सद्गुरू व महाराजा उद्योगसमूहाच्या माध्यमातून सभासदांना मोठा आर्थिक दिलासा देण्यात आला असून, संस्थेच्या वार्षिक सभेत लाभांश व बोनस वाटप करण्यात आले.

स्थैर्य, फलटण, दि. २२ ऑक्टोबर : श्री सद्गुरू व महाराजा उद्योगसमूहाच्यावतीने आयोजित विशेष कार्यक्रमात सभासदांना लाभांश आणि कर्मचाऱ्यांना बोनसचे वितरण करण्यात आले. संस्थेच्या आर्थिक प्रगतीत सभासदांचे मोलाचे योगदान असून त्यांच्या अतूट विश्वासामुळेच संस्थेने यशस्वी वाटचाल सुरू ठेवल्याचे प्रतिपादन संस्थापक अध्यक्ष दिलीपसिंह भोसले यांनी यावेळी केले.

श्री सद्गुरू पतसंस्थेची प्रगती

कार्यक्रमादरम्यान संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी कामकाजाचा सविस्तर आढावा घेतला. त्यानुसार, १९८९ साली स्थापित झालेल्या श्री सद्गुरू पतसंस्थेच्या ठेवी ८० कोटी २८ लाख रुपयांवर पोहोचल्या आहेत. संस्थेचे कर्ज वाटप ५७ कोटी १२ लाख रुपये असून, ६२ लाख ३० हजार रुपयांचा निव्वळ नफा झाला आहे. तसेच, पतसंस्थेची वार्षिक उलाढाल ८०३ कोटी रुपयांवर पोहोचली आहे.

महाराजा मल्टीस्टेटची यशस्वी वाटचाल

२०१० साली स्थापन झालेल्या महाराजा मल्टीस्टेटची ठेवण १२१ कोटी ५७ लाख रुपये असून, ९१ कोटी ५६ लाख रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आले आहे. संस्थेला २ कोटी ३५ लाख रुपयांचा निव्वळ नफा झाला असून, वार्षिक उलाढाल १००० कोटी रुपयांवर पोहोचली आहे. सभासदांना उत्तम सेवा देण्यासाठी संस्था नेहमीच कटिबद्ध असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.

लाभांश व बोनसचे वितरण

या कार्यक्रमात प्रातिनिधिक स्वरूपात श्री सद्गुरू पतसंस्थेचे सुनील सरगर आणि आनंद काळोखे यांना लाभांश वाटप करण्यात आले. तसेच महाराजा मल्टीस्टेटतर्फे उत्तम पवार, नागेश नागनसुरे आणि संपत पिसाळ यांना लाभांश वितरित करण्यात आला. आगामी दिवाळी सणाचे औचित्य साधून पतसंस्थेचे सेवक रूपेश देवरे, ज्योती इंगळे, प्रसन्ना टाळकुटे, अक्षय बागल, संतोष अडागळे आणि शार्दुल कलमदाने यांना बोनसचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी संचालक मंडळ, सभासद व कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. सीईओ संदीप जगताप यांनी आभार मानले.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!