दैनिक स्थैर्य | दि. २४ मार्च २०२३ | फलटण |
महाबळेश्वर येथे नुकत्याच संंपन्न झालेल्या ‘सहकार परिषद २०२३’ मध्ये पश्चिम महाराष्ट्रातील उत्कृष्ट कामकाजाबद्दल श्री सद्गुरू हरीबुवा महाराज नागरी सहकारी पतसंस्थेला ‘बँको ब्लू रिबन’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
यावेळी पुरस्कार स्वीकारताना संस्थेचे चेअरमन तेजसिंह दिलीपसिंह भोसले, महाराजा मल्टीस्टेटचे व्हाईस चेअरमन रणजितसिंह भोसले व संस्थेचे सी.ई.ओ. संदीप जगताप उपस्थित होते.
पुरस्काराचा स्वीकार करताना तेजसिंह भोसले म्हणाले, सद्गुरू व महाराजा उद्योग समूहाचे संस्थापक दिलीपसिंह भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली संस्था प्रेरणादायी कार्य करीत असून ग्राहकांना चांगली सेवा, सभासदांचे हित जपत विविध सामाजिक उपक्रम संस्था नियोजनबद्धरीत्या राबवित असते. या पुरस्काराने भविष्यात उत्कृष्ट कार्य करण्याची प्रेरणा व स्फूर्ती आम्हास मिळणार आहे.
पुरस्कार मिळाल्याबद्दल फलटण तालुक्यातील, जिल्ह्यातील, विविध राजकीय, सामाजिक सहकार, सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांनी संस्थेचे पदाधिकारी व संचालकांचे अभिनंदन केले आहे.