एन आय पी एम च्या चेअरमन पदी सदाशिव पाटील


दैनिक स्थैर्य । दि. ११ ऑगस्ट २०२२ । बारामती । बारामती एमआयडीसी मधील भारत फोर्ज चे मनुष्यबळ विभाग प्रमुख सदाशिव पाटील यांची एन. आय. पी. एम. (National Institute of Personnel Management) पुणे च्या चेअरमन पदी निवड करण्यात आली.
एन. आय. पी. एम. हि देशपातळीवर मनुष्यबळ, औद्योगिक संबंध, प्रशिक्षण व कौशल्य विकास आदी विषयावर कार्यरत असणारी एकमेव संस्था असून पुणे जिल्हातील विविध कंपन्या मधील विविध विभागाचे 520 व्यवस्थापक सभासद आहेत.
सर्व क्षेत्रातील व्यवसायिक व्यवस्थापक यांना माहिती प्रशिक्षण देत त्यांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी प्रयत्नशील राहू असे निवडीनंतर सदाशिव पाटील यांनी सांगितले.


Back to top button
Don`t copy text!