कर्मवीर पुण्यतिथीनिमित्त विद्याप्रबोधनीची रयतची शिक्षण परिषद; ‘उच्चशिक्षणातील नवे प्रवाह ’ विषयावर राष्ट्रीय कार्यशाळा

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य । दि. ०६ मे २०२३ । सातारा ।  रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉ.कर्मवीर भाऊराव पाटील पुण्यतिथी ९ मे २०२३ रोजी असल्याने रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर विद्याप्रबोधिनीने माध्यमिक विभागातील शाखा प्रमुख यांचेसाठी ७ ते ८ मे
२०२३ या कालावधीत रयत शिक्षण परिषदेचे आयोजन केले आहे. तर उच्च शिक्षण विभागातील प्राचार्य आणि प्राध्यापक यांचेसाठी ६ ते ८ मे २०२३ या  काळात ’ उच्च शिक्षणातील नवे प्रवाह’ या विषयावर कार्यशाळेचे आयोजन केले असल्याची माहिती कर्मवीर विद्याप्रबोधिनीचे कार्यकारी संचालक प्राचार्य  डॉ.बी.टी.जाधव यांनी दिली आहे. दरवर्षी शैक्षणिक व्याख्यानमाला आयोजित केली जाते, या वर्षी रयत शिक्षण परिषद अंतर्गत विविध नव्या बाबींची अद्ययावत माहिती देऊन सबंधिताना प्रशिक्षित केले जाणार आहे. माध्यमिक विभागाचे परिषदेचे उद्घाटन यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स ७ मे २०२३ रोजी महाराष्ट्राचे माजी शिक्षण संचालक मा. दिनकर पाटील यांचे व्याख्यानाने होणार असून अध्यक्ष म्हणून रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन डॉ.अनिल पाटील हे मार्गदर्शन करणार आहेत. संस्थेचे सचिव प्राचार्य,डॉ.विठ्ठल शिवणकर ,सहसचिव प्राचार्य डॉ.शिवलिंग मेनकुदळे, माध्यमिक विभागाचे सहसचिव मा.राजेंद्र साळुंखे हे उपस्थित राहणार आहेत. याच दिवशी ‘शाळा संकुल’ या विषयावर प्राचार्य डॉ.बी.टी.जाधव,’स्पर्धा परीक्षा आणि करीयर गायडन्स’ या विषयावर प्राचार्य डॉ.के.सी.शेख, ‘आधुनिक प्रयोग शाळांची उभारणी व मांडणी’ या विषयावर मा. व्ही.आर.गुजले’ आधुनिक प्रयोग शाळांचा प्रभावी वापर’ या विषयावर मा.श्री.एस.आर.भोसले या विषयावर व्याख्यान देऊन मुख्याध्यापक व शिक्षक यांच्याशी संवाद साधणार आहेत. ८ मे रोजी सकाळी ९ वाजता पुणे येथील आयसरच्या मार्गदर्शक डॉ.मनवा दिवेकर या’STEM EDUCATION शिक्षण’ या विषयावर व्याख्यान देणार आहेत तर ‘रयत मधील STEM EDUCATION‘ ची अंमल बजावणी’ या विषयावर मा.डॉ.सुधीर कुंभार,’फौंडेशन कोर्स या विषयावर मा.सौ.एस.एस.कापरे ,’ऑनलाईन प्रणालीचा प्रभावी वापर या विषयावर मा.प्रशांत कोळसे, A.R .V.R,& AL या विषयावर डॉ.शरद निंबाळे,आधुनिक विषय अभ्यासक्रम ‘या विषयावर प्रा.शशिकांत शिंदे हे मार्गदर्शन करणार आहेत. या दोन दिवशी सायंकाळी ५ ते ६.३० या वेळेत आप्पासाहेब इंग्लिश मिडीयम स्कूल व अण्णासाहेब कल्याणी बिद्यालय ,सातारा येथे विविध प्रयोगशाळेस सर्व शाखाप्रमुख भेट देणार आहेत तसेच या दोन दिवशी रात्री ८ वाजता कर्मवीर समाधी परिसर येथे सांकृतिक कार्यक्रम आयोजित केला असून यामध्ये रयत शिक्षण संस्थेच्या निवडक विविध शाखेतून आलेले कलावंत विद्यार्थी कला सादर करणार आहेत. ८ मे २०२३ रोजी दुपारी २.३० वाजता गुणवंत विद्यार्थी,सेवक सत्कार व प्रकाशन कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे.
उच्च शिक्षण विभागासाठी या वर्षी उच्च शिक्षणातील नव्या गोष्टींचे प्रशिक्षण देता यावे य़ासाठी ६ ते ८ मे असे तीन दिवसांची कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. दिनांक ६ मे २०२३ रोजी सकाळी १०.३० वाजता रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन डॉ.अनिल पाटील यांचे व्याखानाने उद्घाटन होणार आहे. याच वेळी आपासाहेब इंग्लिश मिडीयम स्कूल व अण्णासाहेब कल्याणी विद्यालय येथील विविध प्रयोगशाळेचे उदघाटन होणार आहे.यावेळी रयत शिक्षण संस्थेचे सचिव प्राचार्य डॉ.विठ्ठल शिवणकर व संस्थेचे उच्च शिक्षण विभागाचे सहसचिव प्राचार्य डॉ.शिवलिंग मेनकुदळे,प्राचार्य डॉ.बाळ कांबळे यावेळी उपस्थित राहणार आहेत. ६ तारखेस ‘क्लस्टर युनिव्हर्सिटी’ या विषयावरकर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचे प्र-कुलसचिव प्रा.डॉ.विजय कुंभार,’’नेक्स्ट जनरेशन कोर्सेस’ या विषयावर प्राचार्य डॉ.बी.टी.जाधव ,आणि ‘एन.आय.आर.एफ ‘या विषयावर रोहिणी शिंदे या व्याख्यान देणार आहेत. ७ मे रोजी ‘नवीन शैक्षणिक धोरण’ अंमलबजावणी ‘ या विषयावर कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाच्या विज्ञान विभागाचे प्र-अधिष्ठाता डॉ.जयकुमार चव्हाण ,’कौशल्य विकास आणि सामंजस्य करार’ या विषयावर मा.डॉ.सी.डी.भोसले ’संशोधन,नाविन्यपूर्ण उपक्रम व आणि तंत्रज्ञान ‘ या विषयावर डॉ.एस.एच .मुजावर,’स्वायत महाविद्यालये सुधारित नियमावली’ या विषयावर डॉ.एच.पी.उमाप ,’ व्यावसायिक व अनुभव तज्ञ प्राध्यापक ‘ या विषयावर मा.डॉ.अनिलकुमार वावरे यांची व्याख्याने आयोजित केली आहेत. ८ मे २०२३ रोजी सकाळी १०.३० वाजता प्राचार्य डॉ.बाळ कांबळे यांचे ‘नॅक मुल्यांकन : संधी आणि आव्हाने ‘या विषयावर मार्गदर्शन होणार आहे. ‘ऑनलाईन शिक्षण’या विषयावर मा. अमन चौधरी , प्लेसमेंट प्रोग्रेशन’ या विषयावर मा. सुरज पाटील यांची व्याख्याने होणार आहेत. सदर दोन्ही ठिकाणी होणार या परिषदेत रयत शिक्षण संस्थेचे पदाधिकारी उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ सातारा येथील पदाधिकारी
विषयतज्ञ म्हणून उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. संस्थेतील सांस्कृतिक कार्यक्रमाच्यावेळी उपस्थित राहण्याविषयी आवाहन करण्यात आले आहे.


Back to top button
Don`t copy text!