राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी प्रवक्ते मा. गो. वैद्य यांचे निधन, वयाच्या 98 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

 

स्थैर्य, नागपूर, दि.१९: विचारवंत पत्रकार, हिंदुत्वाचे
भाष्यकार, तरुण भारतचे माजी मुख्य संपादक, रा. स्व. संघाचे माजी बौद्धिक व
प्रचार प्रमुख माधव गोविंद उपाख्य बाबुराव वैद्य यांचे शनिवार 19 डिसेंबर
2020 रोजी दुपारी 3.30 वाजता निधन झाले.

परखड
मतांसाठी मा. गो. वैद्य यांना ओळखले जात होते. ते तरुण भारतचे माजी मुख्य
संपादक होते. आज दुपारी 3.30 वाजता मा. गो. वैद्य यांनी अखेरचा श्वास
घेतला. प्रकृती अस्वास्थ्यामुळे ते गेल्या काही काळापासून आजारी होते.
यामुळे त्यांना स्पंदन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते.

त्यांच्या
पश्चात पत्नी सुनंदा, तीन मुली- विभावरी गिरीश नाईक, डॉ. प्रतिभा उदय
राजहंस, भारती जयंत कहू, तसेच पाच मुले- धनंजय, डॉ. मनमोहन (सह सरकार्यवाह,
रा. स्व. संघ), श्रीनिवास, शशिभूषण व डॉ. राम (हिंदू स्वयंसेवक संघ, सह
संयोजक) व बराच मोठा आप्त परिवार आहे. अंत्ययात्रा रविवार 20 डिसेंबर रोजी
सकाळी 9.30 वाजता त्यांचे राहते घर- 80, विद्याविहार, प्रतापनगर, नागपूर-22
येथून निघेल व अंबाझरी घाटावर अंत्यसंस्कार होतील.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!