
दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
थेट WhatsApp वर मिळवा
दैनिक स्थैर्य | दि. ०१ नोव्हेंबर २०२१ | सातारा | येथील गुरुवार पेठेतील कमानी हौदाजवळील बंद घर फोडून चोरट्यांनी २२ हजार रुपयांचे साहित्य चोरुन नेले.
कमानी हौदाच्या पाठीमागील बाजूस नईम नजीर शेख हे राहण्यास आहेत. ता. २९ रोजी त्यांचे बंद घर चोरट्यांनी फोडत आतील १० हजारांचा स्मार्ट टिव्ही, १० हजारांचे तांब्यांची भांडी, २ हजारांची पातेली असा सुमारे २२ हजाराचे साहित्य चोरुन नेले. याची तक्रार शेख यांनी सातारा शहर पोलिस ठाण्यात नोंदवली असून तपास हवालदार सणस हे करीत आहेत.



