
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा

प्रहारचे तालुकाअध्यक्ष विनोद तेलंगे यांचे तहसीलदारांना निवेदन
स्थैर्य, उदगीर, दि. 16 (राहुल शिवणे) : उदगीर तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदाराने स्वस्त धान्य दुकानास शासनाकडून ज्या नियमांचे पालन करण्यास सांगितले आहे त्या नियमांचे पालन न करता रेशनकार्ड धारकांना राशन पावती देत नाहीत दुकानात भाव फलक लावणे गरजेचे आहे तरी देखील भाव फलक लावले जात नाही याची योग्य ती तपासणी प्रशासनाच्या वतीने व्हावी अन्यथा प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा ईशारा प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुका अध्यक्ष विनोद तेलंगे यांनी तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात दिला आहे.
या निवेदनावर तालुका उपाध्यक्ष महादेव मोतीपवळे, महादेव आपटे, बालाजी बिरादार, जांभळे दत्तात्रय, संतोष सूर्यवंशी, संदीप पवार यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
