दैनिक स्थैर्य | दि. २ ऑक्टोबर २०२४ | फलटण |
फलटणमधील जिंती नाका रस्त्यावर ३० सप्टेंबर रोजी दुपारी १.३० वाजण्याच्या सुमारास १६ म्हैशींना क्रूरपणे डांबून कत्तलीसाठी घेऊन जाणारा टेम्पो (क्र. एमएच-०३-सीपी-९०२४) पोलिसांनी पकडून या म्हैशींची सुटका केली.
या गुन्ह्याची नोंद फलटण शहर पोलीस ठाण्यात झाली असून इरफान अत्तार कागदी, रा. कोरेगाव, ता. कोरेगाव, जि. सातारा याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. यावेळी पोलिसांनी आयशर टेम्पो (अंदाजे किंमत रु. ४,००,०००), १६ म्हैशी (अंदाजे किंमत २,५०,००० रुपये), असा एकूण ६,५०,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
या घटनेचा तपास पो. हवा. सचिन फाळके करत आहेत.