
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
दैनिक स्थैर्य | दि. १ ऑक्टोबर २०२४ | फलटण |
चालक मालक वाहतूक संघटना फलटण, लोणंद, दहिवडी, पुसेगाव यांनी विधान परिषदेचे माजी सभापती तथा विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांची भेट घेऊन त्यांना आरटीओ विभागाकडून लावले जाणारे नियम शिथिल करण्याबाबत निवेदन दिले.
संघटनेच्या सदस्यांनी आरटीओ विभागाचे ट्रॅफिक हवालदार नियमांचा हवाला देत रोज आम्हाला त्रास देत असून आमच्याकडून १०० ते २०० रुपये वसुल करून आमचे आर्थिक नुकसान करत असल्याचे श्रीमंत रामराजेंना सांगितले.
यावेळी श्रीमंत रामराजेंनी याबाबत आरटीओ विभागाशी चर्चा करून मार्ग काढण्याचे आश्वासन चालक-मालक वाहतूक संघटनेला दिले आहे.
