प्रोग्रेसिव्ह कॉन्व्हेंट स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, गुणवरे येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

दैनिक स्थैर्य । दि.२८ जानेवारी २०२२ । फलटण । सरस्वती शिक्षण संस्था संचलित विध्यार्थांच्या सर्वांगीण विकासात अग्रेसर असणारे प्रोग्रेसिव्ह काॅन्व्हेंट स्कूल अँड ज्युनियर कॉलेज,गुणवरे येथे ७३ वा प्रजासत्ताक दिन कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन करून उत्साहात साजरा करण्यात आला.

या कार्यक्रमास प्रमुख अतिथी फलटणचे नगरसेवक व दैनिक पुढारीचे पत्रकार मा.श्री.अजय माळवे,त्यांच्या सुविद्य पत्नी मा.सौ.चंदना माळवे उपस्थित होते त्यांनी शिक्षकांना संबोधित केले.सरस्वती शिक्षण संस्थेचे सचिव मा.श्री.विशाल सर ,संस्थेच्या कार्यकारी संचालिका मा.सौ. संध्या गायकवाड मॅडम,संस्थेच्या संचालिका मा.सौ.प्रियांका पवार मॅडम यांनी शिक्षकांना मार्गदर्शन केले.प्रशालेचे मुख्याध्यापक मा.श्री.सुनिल अहिरे सर यांनी प्रास्ताविक केले.

प्रशालेचे पर्यवेक्षक मा.श्री.किरण भोसले सर,समन्वयिका मा.सौ.सुप्रिया सपकाळ मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन करून सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम संपन्न केला. विद्यार्थ्यांनी विविध स्वातंत्र्यसैनिकावर भाषणाचे व्हिडिओ सादर केले. सूत्रसंचालन सौ.सुजाता गावडे मॅडम यांनी केले व आभार प्रदर्शन सौ.प्रतिभा नाळे मॅडम यांनी केले.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!