
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
दैनिक स्थैर्य । दि. ०७ डिसेंबर २०२१ । सांगली । भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त सांगली बस स्थानकासमोरील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास सहकार व कृषि राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या माध्यमातून जो विचार आपल्या देशातील नागरिकांना दिला आणि ज्याच्या पायावर भारतीय लोकशाही मजबूतपणे सध्या कार्यरत असल्याचे सांगून सहकार व कृषि राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे स्मरण व जतन करण्याचे आवाहन यावेळी केले.
यावेळी जिल्हा नियोजन समितीचे सदस्य पृथ्वीराज पाटील, समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त जयंत चाचरकर, नगरसेवक मंगेश चव्हाण, जितेश कदम आदि उपस्थित होते.
